रत्नागिरीत वायूगळतीची मोठी दुर्घटना, अनेक विद्यार्थ्यांना त्रास, रुग्णांना जिल्हा शासकीय आणि खासगी रुग्णालयात हलवलं 

रत्नागिरीतून मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरीत एका कंपनीतून गॅसची गळती झाल्यामुळे एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना गॅस गळतीमुळे श्वसनाचा त्रास आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

रत्नागिरीत वायूगळतीची मोठी दुर्घटना, अनेक विद्यार्थ्यांना त्रास, रुग्णांना जिल्हा शासकीय आणि खासगी रुग्णालयात हलवलं 
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 5:07 PM

रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा मोठा त्रास झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुार, जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांना वायुगळतीमुळे त्रास होत आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी आता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. संबंधित घटना नेमकी का घडली आणि ती पुन्हा घडू नये, यासाठी काय-काय काळजी घेतली जाणार? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना त्यांचे आई-वडील आणि रत्नागिरीतील सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

गेल्या आठवड्यात टँकरमधून वायू गळती

दरम्यान, रत्निगिरीत गेल्या आठवड्यातही एका टँकरमधून गॅस गळतीची घटना घडली होती. टँकरमधून गॅस गळती होत असल्याचं चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच नागरिकांकडे मदत मागितली होती. शहरातील डी-मार्टजवळ टँकर आल्यानंतर ही घटना घडली होती. यानंतर अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं होतं. अग्निशामक दलाच्या जवानांनी गॅस गळती थांबवली होती. यानंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.