राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट, का वाढलाय पावसाचा जोर?

Weather update and Rain : राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु आहे. मुंबईत बुधवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट दिलाय.

राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट, का वाढलाय पावसाचा जोर?
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 8:42 AM

पुणे | 27 जुलै 2023 : राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागांतील नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. गोदावरी नदीची पातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर असलेले मेडिगट्टा धरणाचे दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले आहे.

मुंबईत काय आहे परिस्थिती

मुंबईत गुरुवारी दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला रेड अलर्ट दिल्यामुळे कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई आयुक्त इकबालसिंग चहल यांनी केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

का सुरु आहे पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे अजून पुढील तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्ह्यास पुन्हा रेड अलर्ट

पुणे जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, अमरावती जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या दहा तासांपासून स्थिर आहे. यामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील धरणांत असणारा पाणीसाठा

  • खडकवासला: ९६ टक्के
  • पानशेत: ७३ टक्के
  • वरसगाव: ६५ टक्के
  • टेमघर: ४९ टक्के

विदर्भात पाऊस

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, सोलापूर, सांगलीमध्ये पावसाची शक्यता आहे.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.