कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय? वाचा A टू Z, कुणाला किती मतं मिळाली?

Konkan Region Graduate Constituency Result : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी झाले आहेत, अशी घोषणा विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी केली.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय? वाचा A टू Z, कुणाला किती मतं मिळाली?
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय?
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 10:30 PM

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली. तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. या निवडणुकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी झाले आहेत, अशी घोषणा विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी केली.

पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले, असं निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

निरंजन डावखरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

निरंजन डावखरे यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “मी तिसऱ्यांदा त्याच मतदारसंघातून निवडून आलो आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. कर्मचारी आणि पदवीधरांनी माझ्यावर विश्वास पुन्हा दाखवला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवेन. प्रचार करताना कोणी कितीही जोर लावला तरी निकाल आता स्पष्ट आहे. यामध्ये मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाला त्यांचे देखील आभार मानतो. तिसऱ्यांदा निवडून आलो असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच मी काम करेन”, अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली.

कोणत्या उमेदवाराला किती मते?

  1. निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719
  2. कीर रमेश श्रीधर, काँग्रेस :- 28 हजार 585
  3. विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- 536
  4. अमोल अनंत पवार, अपक्ष :- 200
  5. अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310
  6. अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302
  7. गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- 424
  8. जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64
  9. नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215
  10. प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33
  11. मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- 208
  12. ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- 334
  13. श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- 141

महाराष्ट्रात नेमकी लढत कुणाकुणामध्ये?

  • कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस)
  • मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट)
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती)
  • नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट)
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.