बड्या राजकीय नेत्याच्या मुलीने सोशल मीडियावरुन वडिलांचा फोटो हटवला, कारण…

eknath khadse: एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्यामुळे रावेर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोण असणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. यासंदर्भात जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि रवींद्र पाटील यांच्यात गुप्त चर्चा झाली होती. अखेर श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बड्या राजकीय नेत्याच्या मुलीने सोशल मीडियावरुन वडिलांचा फोटो हटवला, कारण...
रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांचा फोटो काढला
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 10:35 AM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत आयाराम-गयाराम प्रकार होत आहे. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. एकाच परिवारातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. आता जळगाव जिल्ह्यातील बडे नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीने वेगळा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरुन एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे.

एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार तर रोहिणी राष्ट्रवादीत

एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहे. परंतु त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विद्यमान खासदार आणि आता रावेर लोकसभेच्या भाजप उमेदवार आहेत. आता सासरा आणि सून एक पक्षात तर वडील आणि मुलगी वेगवेगळ्या पक्षात असणार आहे. यामुळे रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणं पसंत केले आहे.

रोहिणी खडसे म्हणतात…

एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णयावर माहिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रोहिणी खडसे म्हणाल्या, त्यांचा निर्णय का झालाय हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रवादी पक्षासाठी येथे थांबली आहे. शरद पवार यांनी आम्हाला साडेतीन वर्षे मदत केली आहे. नाथाभाऊ भाजप सोबत जात आहेत. यामुळे आपण एकटं पडणार असे वाटत. पण कार्यकर्ते आणि लोक आमच्यासोबत आहेत. मी राष्ट्रवादी पक्षात रुरळे आहे. पक्षातील प्रत्येक जण माझ्यासोबत आहेत. आता मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

रावेरमध्ये श्रीराम पाटील उमेदवार

एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्यामुळे रावेर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोण असणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. यासंदर्भात जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि रवींद्र पाटील यांच्यात गुप्त चर्चा झाली होती. अखेर श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.