Nawab Malik यांच्यावरील कारवाईचं UP Election शी थेट कनेक्शन? रोहित पवारांना काय संशय?
कोणत्याही नोटिशीविना ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. या कारवाईमागे तीन गोष्टी असून शकतात, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीने चौकशी (ED Enquiry) सत्र सुरु केले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक आलं आणि त्यांना चौकशीसाठी घेऊन गेलं. कोणत्याही नोटिशीविना ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. या कारवाईमागे तीन गोष्टी असून शकतात, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. भाजपने राजकारण करून ही कारवाई केली असली तरीही ही इतर पक्षाच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा नसून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. याविरोधात भाजपविरोधी सर्व पक्ष एकवटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश निवडणुकांशी काय संबंध?
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने जी कारवाई केली आहे, त्याचा उत्तर प्रदेशातील निवडणुकांशी संबंध असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘ आज उत्तर पर्देशमध्ये जो टप्पा सुरु आहे. त्यात भाजपचे जे मोठे उत्तर प्रदेशचे नेते, म्हणजे मौर्य असतील, इतरही जे आहेत, त्यांचं ते कार्यक्षेत्र आहे. उत्तर प्रदेशातील मतदानाच्या मागील अनेक टप्प्यात सपाला जो काही प्रतिसाद मिळतो आहे, भाजपचे जे छोटे नेते आहेत, ते उत्तर प्रदेशात भाजपला सहकार्य करत नाहीत, असं दिसतंय. त्यामुळे कदाचित उत्तर प्रदेशातील लोकांना एक संदेश द्यायचा असेल की महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याला आम्ही विदाउट नोटीस ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे जे राहिलेले जे मतदान असतील, त्यात आमचं नीट ऐका, नाही तर उत्तर प्रदेशातही आम्ही कारवाई करू शकतो, असाही संदेश द्यायचा असेल. म्हणून भाजपने ही कारवाई केली असेल, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे.
रोहित पवारांनी आणखी दोन कारणं काय सांगितली?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवाब मलिकांवरील कारवाईमागे आणखी दोन कारणं असल्याचा संशय व्यक्त केला. यापैकी एक कारण उत्तर प्रदेश निवढणुकीचं. त्यानंतर दुसरं कारण सांगताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात मलिक साहेबांनी जे ड्रग रॅकेट आहे, त्यात भाजपचे काही नेते, पदाधिकारी, अधिकारी असतील ते उघडकीस आणलं. गुजरातमध्ये 22 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ड्रग ऑफिशियली सापडलं आहे. त्यामुळे इथं उघडलेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल का, अशी भीती असावी. यामुळेही नवाब मलिकांवर ही कारवाई झाली असावी. मलिक यांच्यावरील कारवाईचं तिसरं कारण सांगताना रोहित पवार म्हणाले की, पुढील महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. नवाब मलिक हे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत. येथील निवडणुकांची मोठी जबाबदारी रोहित पवार यांच्यावर आहे. इथे भाजपला फटका बसू नये, यासाठी हे राजकारण केलं असावं, असाही एक संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या-