साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा वादातील मालेगाव दौरा रद्द, मुस्लीम संघटनांचा होता विरोध
Sadhvi Pragya Singh Thakur: साध्वी प्रज्ञासिंह यांचा मालेगाव दौरा सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याने साध्वी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.

Sadhvi Pragya Singh Thakur: मालेगावात २००८ मध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह मालेगावात येणार होत्या. मालेगावात होणाऱ्या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित राहणार होत्या. परंतु रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लीम संघटनांकडून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. न्यायालयाने काही अटींवर साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगावात जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर त्यांचा दौरा आता रद्द झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
स्वाधींना दिला जाणार होता हिंदूवीर पुरस्कार
साध्वी प्रज्ञासिंह यांचा मालेगाव दौरा सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याने साध्वी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. रविवारी मालेगावात संत संमेलन होत आहे. या संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जाणार होता. परंतु स्वाध्वी प्रज्ञासिंह मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. त्यांच्या या दौऱ्यास मुस्लीम संघटनांनी विरोध केला. यामुळे स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकरे यांच्या दौऱ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
या अटींवर दौऱ्यास परवानगी
स्वाध्वी प्रज्ञासिंह यांच्या मालेगाव दौऱ्यास परवानगी नाकारल्यानंतर आयोजक उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर स्वाध्वी प्रज्ञासिंह यांच्या दौऱ्यास काही अटी शर्तींवर परवानगी देण्यात आली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रम संपवण्याचे म्हटले होते. तसेच साध्वींनी प्रक्षोभक भाषण न करण्याची अटसुद्धा न्यायालयाने घातली होती. या अटींच्या अधीन राहून कार्यक्रमाला परवानगी दिली होती.




स्वाध्वी प्रज्ञासिंह मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणार होत्या. दुपारी २ वाजता त्यांच्या कार्यक्रमाची वेळ होती. परंतु त्या अद्याप मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात पोहचल्या नसल्याची माहिती मिळाली. आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी दौरा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिला. आयोजकांना मात्र साध्वी प्रज्ञासिंह कार्यक्रमाला येतील, अशी अपेक्षा आहे. तसेच मिलिंद एकबोटे देखील संत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली.