सैराट फेम आर्चीला धक्काबुक्की, कार्यक्रमातच आर्ची चाहत्यांवर जाम भडकली, पाहा व्हिडिओ
rinku rajguru Jalgaon News | रिंकू राजगुरुने झिंगाट या गाण्यावर नृत्य करत उपस्थित जळगावकरांची मन जिंकली. कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहात्यांची मोठी केली. त्या गर्दीत धक्काबुक्की झाली. एका चाहत्याने तिचा हात पकडला.
किशोर पाटील | दि. 4 मार्च 2024 : जळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला होता. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची विशेष उपस्थिती होती. यावेळी आर्चीने (रिंकू राजगुरु) सैराट चित्रपटातील डायलॉग म्हणत तसेच गाण्यांवर नृत्य करत जळगावकरांची मने जिंकली. परंतु त्या कार्यक्रमास अतिउत्साही लोकांनी गालबोट लावले. यावेळी कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला भेटण्यासाठी चाहात्यांची मोठी गर्दी केली. गर्दीत रिंकू राजगुरु हिला धक्काबुक्की झाली. त्यानंतर रिंकू राजगुरुचा संताप आनावर झाला. आर्ची चाहत्यांवर जाम भडकली.
आर्चीने सुनावले खडे बोल
जळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा मोठ्या जल्लोषात समारोप झाला. या समारोप कार्यक्रमाला सैराट या गाजलेल्या मराठी चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू याची उपस्थिती होती. सैराट मधील आर्चीला म्हणजेच रिंकू राजगुरू हिला बघण्यासाठी जळगावकरांनी महासंस्कृती महोत्सवात मोठी गर्दी केली. यावेळी रिंकू राजगुरु हिने सैराट चित्रपटातील “मराठीत कळत नाही का इंग्रजीत सांगू” असा डायलॉग सर्वांना ऐकला.
तसेच झिंगाट या गाण्यावर नृत्य करत उपस्थित जळगावकरांची मन जिंकली. कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहात्यांची मोठी केली. त्या गर्दीत धक्काबुक्की झाली. एका चाहत्याने तिचा हात पकडला. त्यावेळी आर्ची चांगलीच संतापली. तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का ? अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना खडेबोल सुनावले. महासंस्कृती महोत्सवात मोठ्या जल्लोषात समारोप झाला. परंतु शेवट गोड झाला नाही.
रिंकू राजगुरु म्हणजे आर्ची चाहत्यांवर संतापली, कारण…#Jalgaon pic.twitter.com/pJ5ry2bib4
— jitendra (@jitendrazavar) March 4, 2024
सैराट चित्रपटाचा गीतांवर ठेका
जळगावकरांनी रिंकू राजगुरू हिला उस्फूर्तपणे भरभरून दाद दिली. जळगावकरांनी सुद्धा सैराट चित्रपटाचा गीतांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं. यावेळी रिंकू राजगुरुने प्रेक्षकांशी संवाद सुद्धा साधला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुद्धा उपस्थित होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.