AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता आबांमुळे समजली; गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उजाळा

Devendra Fadnavis on Ganpatrao Deshmukh : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही दिवस सुट्टी न घेणारे,सर्वात आधी येणारे अन् सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख!; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता आबांमुळे समजली; गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उजाळा
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 4:51 PM

सांगोला | 13 ऑगस्ट 2023 : दिवंगत नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यातील तसंच जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं.

गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा मला योग आला. मात्र आम्ही त्यांना म्हणायचो की, आबासाहेब यांच्या 100 व्या जन्मदिनाचा कार्यक्रम आम्ही विधी मंडळात साजरा करणार आहोत. पण दुदैवाने ते आपल्यात नाही याची खंत वाटते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली.

परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. पण पण या संसारात काही गोष्टी असतात. त्यात परिवर्तन होतं नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे आबासाहेब! गणपतराव देशमुख हे परिवर्तनाचे नियम बाजूला ठेवून जगणारे एक व्यक्ती होते. 1986 साली इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखस्त केलं. तेव्हा मंत्रिपदाच्या साऱ्या गोष्टी सोडून ते गावी आले. सर्व गाडी, सुरक्षा सोडून एसटीने गावाकडे आले. मी आबासाहेब यांच्याकडे पाहून वाटचाल करणार मी एकलव्य आहे. हे मला आवर्जून सांगावं लागेल, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या दुष्काळाची दाहकता, दुष्काळ दुखणं आम्हाला गणपतराव देशमुखांमुळे समजलं. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही दिवस सुट्टी न घेणारा, पावणे अकरा वाजता सभागृहात पाहिले येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख हे होते. कोणतेही विधेयक चर्चेवीना पास होऊ नये असे त्यांचं म्हणणं होतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आबासाहेब म्हणजे वन मॅन आर्मी होते. सभागृहात असताना त्यांनी हात वर केला की सर्वजण शांत व्हायचे. सूतगिरणी ज्याप्रकारे प्रामाणिकपणे चालवली तशी सूतगिरणी कुणीही चालवली नाही. आर्थिक नियमितता होऊन एकदाही सूतगिरणी बंद पडली नाही. कारण संस्था या आपल्या मालकीच्या नसून जनतेच्या आहेत असं मानून ते काम करत, असंही फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला तर इतर कोणाचाही पुतळा दिसतं नाही. त्यामुळे त्यांचा पुतळा चांगल्या ठिकाणी करू. रण त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे. गणपतराव देशमुख यांचं स्मारक विधानमंडळात नक्की करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी भाषणावेळी सांगोलाकरांना दिला.

मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.