राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा आज मुंबईत साखरपुडा आहे. या मंगलप्रसंगी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. (sanjay raut daughter purvashi raut engagement ceremony today)

राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 1:14 PM

मुंबई: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा आज मुंबईत साखरपुडा आहे. या मंगलप्रसंगी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सोहळ्यानिमित्त एकत्र येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पुन्हा एकदा हे दिग्गज नेते एकत्र येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (sanjay raut daughter purvashi raut engagement ceremony today)

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा आज सायंकाळी 7 वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा होणार आहे. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. त्यानिमित्ताने राऊत यांनी मोजक्याच मान्यवरांना या मंगल सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या सोहळ्यानिमित्ताने हे सर्व दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘पीएम’, निमंत्रण पत्रिका लक्षवेधी

संजय राऊत यांनी कन्येच्या साखरपुड्याची छापलेली निमंत्रण पत्रिकाही लक्षवेधी ठरली आहे. गुलाबी रंगाची ही निमंत्रण पत्रिका अधिकच उठावदार दिसते. पूर्वशी यांच्या नावातील अद्याअक्षर असलेलं ‘पी’ आणि मल्हार यांच्या नावातील ‘एम’ हे अद्याक्षर घेऊन ‘पीएम’ असा ठळक उल्लेख या निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. त्यामुळे पत्रिका उघडताच ‘पीएम’ ही अद्याक्षरे सर्वांची लक्ष वेधून घेतात. त्यानंतर वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची नावे दिसतात. नंतर पूर्वशी आणि मल्हार यांची नावं असून त्यांचा साखरपुडा होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर मल्हार यांच्या मातोश्री सीमा आणि वडील राजेश नार्वेकर यांची नावे आहेत. नंतर साखरपुड्याची तारीख आणि स्थळ देण्यात आलं आहे. तसेच निमंत्रकांमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, संदीप राऊत आणि सविता राऊत यांची नावे छापण्यात आली आहेत.

राऊतांची सहकुटुंब पवारांशी भेट

यापूर्वी संजय राऊत यांनी कन्येच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेतली होती. यावेळी राऊत यांच्या सोबत त्यांची पत्नी वर्षा राऊत, मुलगी पूर्वशी हे देखील उपस्थित होते. यावेळी पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. याच दरम्यान, वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर राऊत पवारांना सहकुटूंब भेटल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, राऊत यांनीच मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी आल्याचं स्पष्ट केलं होतं. (sanjay raut daughter purvashi raut engagement ceremony today)

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला, तात्याराव लहानेंचा गौप्यस्फोट

(sanjay raut daughter purvashi raut engagement ceremony today)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.