Sanjay Raut on Election Commission | ‘निवडणूक आयोगाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय’, वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊत यांची माघार नाहीच

संजय राऊत यांनी सांगलीत भाषण करताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली. त्यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही.

Sanjay Raut on Election Commission | 'निवडणूक आयोगाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय', वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊत यांची माघार नाहीच
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:26 PM

सांगली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगलीत भाषण करताना केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) अर्वाच्य शब्दांत टीका केलीय. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिवीगाळ केलीय. त्यांच्या शिवीगाळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याबद्दल राऊत यांना विचारलं असता त्यांनी ते विधान मागे घेतलं नाही. याउलट त्यांनी शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल होतोय तर होऊद्या व्हायरल. अख्खा महाराष्ट्र निवडणूक आयोगाला शिवीगाळ करत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

सांगलीतली संजय राऊत यांची सभा आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचं म्हटलं. “उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा खरी शिवसेना असल्याचं जनतेने स्वीकारलेलं आहे. निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला असेल तो कागदावरचा निकाल आहे. हा लोकांच्या मनाचा निर्णय नाही. जर तु्म्हाला खरी शिवसेना कोणती हे ठरवायचं असेल तर आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहोत. आता जनता ठरवेल की शिवसेना कोणाची”, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान नेमकं काय?

“संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके देवून पळून गेले आहेत. आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?”, असं संजय राऊत सांगलीच्या कार्यक्रमात म्हणाले.

राऊत आणखी भाषणात काय म्हणाले?

“खूप वर्षांनी मी सांगलीत आलोय. सांगलीत प्रवेश केल्यापासून रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी स्वागत केलं. यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम बांधव होते. शिवसैनिकांनी गर्जना करत स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले हे परत निवडून येणार का? 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की जगात कुठली गोष्ट लोकप्रिय झाली नाही आणि वाऱ्यासारखी पसरली नाही. पण आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण 50 खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलं आहे”, असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

“मुख्यमंत्री विषयी बोलणं योग्य नाही. सन्मान राखला पाहिजे. पण जर जनतेच्या भावना असतील तर मी काही बोलणार नाही. ज्यांनी शिवसेने सोडली त्यांना आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिंदे आणि चाळीस चोरांनी, दिल्लीच्या रंगा बिल्लांनी काय समजलं? निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. त्यानंतर राज्यात वणवा पेटला आहे”, असा दावा राऊतांनी आपल्या भाषणात केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.