संजय राऊतांच्या घरी सनई-चौघडे, मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं राज्यपाल कोश्यारींना निमंत्रण
खासदार संजय राऊत यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं निमंत्रण राज्यपालांना दिलं. तत्पूर्वी संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सनई-चौघडे वाजायला सुरुवात झालीय. राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. 29 नोव्हेंबरला मुंबईतील रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्निक राजभवनावर गेले होते. (Sanjay Raut invites Governor Bhagat Singh Koshyari for daughter Purvashi’s wedding)
खासदार संजय राऊत यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं निमंत्रण राज्यपालांना दिलं. तत्पूर्वी संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देत लग्नाची पत्रिका दिली. दरम्यान, राऊत यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे सकाळी काही काळ चर्चेला उधाण आलं होतं.
Member of Parliament (Rajya Sabha) Sanjay Raut met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call. pic.twitter.com/Xf6FGWuqec
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 9, 2021
कोण आहेत संजय राऊतांचे व्याही?
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.
राऊतांपूर्वी वानखेडे कुटुंबीय राज्यपालांच्या भेटीला
संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेण्यापूर्वी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वानखेडे यांच्या कुटुंबियांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिलं आहे. राज्यपालांनी सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन दिल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितलं.
आम्ही खऱ्याची लढाई लढत आहोत. आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं आहे. आम्हाला राज्यपालांचा पाठिंबा हवा आहे. त्याबाबत राज्यपालांनी आश्वासन दिलं आहे. मी असाच लढत राहणार. राज्यपालांकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. ती स्फुर्ती घेऊन आम्ही अधिक ताकदीने लढणार आहोत. जी सत्य परिस्थिती आहे ती राज्यपालांकडे मांडली. आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं जात आहे. इज्जत आणि अब्रूवर टीका केली जात आहे. टॉन्ट मारले जात आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती राज्यपालांकडे मांडली आहे. राज्यपालांनी सांगितलं की सत्याचा विजय नक्की होईल. राज्यपालांची भेट सकारात्मक झाली आहे. काही सविस्तर माहिती आम्ही देऊ शकत नाही, असं क्रांती रेडकरने सांगितलं.
इतर बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास, दोन दिवसांत शस्त्रक्रियेची शक्यता
Sanjay Raut invites Governor Bhagat Singh Koshyari for daughter Purvashi’s wedding