शरद पवारांशिवाय देशात तगडा उमेदवार उरलाय का? संजय राऊत म्हणतात, आता राष्ट्रपती निवडणुकीत रंगत नाही!

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता बोलावलेल्या बैठकीत ममता यांनी शरद पवार यांना उमेदवार होण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला.

शरद पवारांशिवाय देशात तगडा उमेदवार उरलाय का? संजय राऊत म्हणतात, आता राष्ट्रपती निवडणुकीत रंगत नाही!
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 10:33 AM

मुंबईः शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential Election) लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर निवडणुकीतली हवाच निघून गेली आहे. पवारांनी नाही म्हणल्यावर देशात कुणी इतर तगडा उमेदवार उरलाय का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. देशात आतापर्यंत मोजकेच राष्ट्रपती चांगले मिळाले. यात प्रणवदा, अब्दुल कलाम यांची नावं आहेत. अन्यथा नेहमीच सत्ताधारी पक्षानी आपल्या मर्जीतील नेत्याला राष्ट्रपती पदावर निवडून दिले आहे. यंदा तरी शरद पवार (Sharad Pawar) या निवडणुकीसाठी उभे राहिले असते निवडणुकीत तर रंगत आली असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

…तर पारडं पवारांच्या बाजूने झुकलं असतं…

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी किमान सहा महिने आधी करायला हवी होती, असं संजय राऊत म्हणाले. तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडूकीत शरद पवार उभे राहिले नाही. आता सत्ताधारी पक्षाकडून एखादं नाव पुढे येईल. कारण देशात त्या तुलनेत तगडा उमेदवार नाहीच. आता या पदावर सत्ताधारी पक्षातला नेताच पाठवला जातो. ते हो म्हणाले असते तर रंगत आली असती. पवारांच्या बाजूने पारडं झुकलंही असतं. सत्ताधारी पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही. अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असतं. भाजपची संपू्र्ण मदार खासदारांवर आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विरोधकांच्या बैठकीत काय झालं?

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता बोलावलेल्या बैठकीला पक्षांपैकी 22 पक्षांना आमंत्रण दिलं होतं. मात्र यात फक्त 18 पक्ष सहभागी झाले. या बैठकीला ममता यांनी शरद पवार यांना उमेदवार होण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला. यानंतर ममता यांनी प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृ्ण गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचे नाव सूचवले. त्यावर विविध पक्षांच्या नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. ममतांच्या या बैठकीला काँग्रेस, सपा, एनसीपी, डीएमके, शिवसेना, राजद, नॅशनल काँफरन्स, पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते. तर आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, शिरोमणी अकाली दल आणि बिजद यांनी पाठ फिरवली. दरम्यान, शरद पवार यांनी या विषय़ावर 20 किंवा 21 तारखेला मुंबईत एक बैठक बोलावली आहे. ते निवडणूक लढवू इच्छित नाही तर ही बैठक का बोलावली असेल, याविषयी आता तर्क वितर्क लावले जात आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.