AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; sanjay raut यांचा विरोधकांवर हल्लाबोल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह काढला आहे. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे.

VIDEO: यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; sanjay raut यांचा विरोधकांवर हल्लाबोल
आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; sanjay raut यांचा विरोधकांवर हल्लाबोल Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 11:10 AM
Share

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह काढला आहे. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का बघावं लागेल. हा पेन ड्राईव्ह… तो पेनड्राईव्ह… आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. बरं का फाट्कन, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक भंपक आणि खोटं प्रकरण तयार करतात. कसं काय यांना हे बाळंतपण जमतं माहीत नाही. कुठून सुईणी आणतात हे बाळंतपण करायला खोट्याप्रकरणाची. महाराष्ट्रात हे नवीनच आहे. यांनी पेनड्राईव्हची फॅक्ट्री काढली आहे का? केंद्रीय चौकशी समिती आणि यांची मिलीभगत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना अडचणीत आणलं जात आहे. काही दिवसाने ते तामिळनाडूत जातील. हे होत आहे. जे करायचं आहे ते करा. तुमच्या शंभर पेनड्राईव्हवर आमचा एक कव्हर ड्राईव्ह भारी पडेल, असा इशाराच राऊत यांनी दिला. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

केंद्रीय तपास यंत्रणा आणि विरोधकांची जी हातमिळवणी सुरू आहे. मिलीभगत सुरू आहे. त्यातून त्यांना महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचं नाही असं दिसतंय. खोट्या प्रकरणातून त्यांना हे सरकार उद्ध्वस्त करायचं आहे. याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात टाकू असं सुरू आहे. आमच्यावर कोणते आरोप आहेत माहीत नाही. पण हे आरोपपत्रं परस्पर तयार करतात. ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचं आहे त्यांची यादी तयार करा. महाराष्ट्रातील या 25 लोकांना तुरुंगात टाकायचं आहे. आम्हाला तुरुंगात टाका आणि मग आरोप करा. आधी तुरुंगात टाका. काही हरकत नाही. तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे तो शांत करा, असं राऊत म्हणाले.

नीच आणि हलकट पातळीवरच राजकारण

खूप पद्धतीचे आरोप होत आहेत. घाणेरड्या पद्धतीचे होत आहेत. याला पद्धत म्हणत नाही. सूड आणि बदला या शिवाय याला शब्द नाही. इतकं नीच आणि इतकं हलकट पातळीवरचं राजकारण या महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला होता. हा साधुसंतांचा देवदेवतांचा संदेश आहे. आम्ही काय पाकिसतानातून आलोय? उलट तुमचेच त्यांच्याशी संबंध आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

अल कायदाचा अजेंडा असाच होता

इसाक बागवान यांना मी ओळखतो. महाराष्ट्र ओळखतो. काहीहीह आरोप करून पोलिसांचे मनोधैर्य खच्ची केलं जात आहे. लोकांच्या घरात शिरू नका. बागवान यांच्याविषयी मी लिखाण केलं आहे. अनेकांनी केलं आहे. त्यांचं पुस्तक आलंय ते वाचलं पाहिजे. 26/11च्या हल्ल्यात त्यांनी जीवाची बाजी लावून काम केलं. इस्रायलच्या मुलाचे त्यांनी जीव वाचवले. इस्रायलनेही त्यांना पुरस्कार दिला. तरीही तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात. पोलिसांचं खच्चीकरण करत आहात. मला वाटतं यांना दाऊदने सुपारी दिलेली आहे. या लोकांनाच पाकिस्तानला सुपारी दिली का अशी शंका आहे. अल कायदाचा अजेंडाच असा होता. काही लोकांना हाती धरायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाची सिस्टीम कमकुवत करायची, त्याला सुरुंग लावायचा. हा अलकायदाचा अजेंडा होता. तो अल कायदाचा अजेंडा ते राबवत आहेत का असं वाटतंय, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

कोमो स्टॉक कंपनीत ठाकरे परिवार पार्टनर, कंपनीतून 7 कोटींची मनी लॉन्ड्रिंग; Kirit Somaiya यांचा मोठा आरोप

Weather forecast : राज्यात उष्णतेची लाट, कोकणात पावसाचा अंदाज

Maharashtra News Live Update : विधानभवनाच्या पायऱ्यावर भाजपच्या नेत्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.