संजय राऊतांचा जावई पाहिला का? कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो तुमच्यासाठी!

सनई चौघड्यांचे सूर आणि मंत्रोच्चार अशा भारलेल्या वातावरणात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा आज पार पडला.

संजय राऊतांचा जावई पाहिला का? कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो तुमच्यासाठी!
या वेळी पूर्वशी आणि मल्हार दोघंही प्रचंड खूश दिसले.
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 1:27 PM

मुंबई: सनई चौघड्यांचे सूर आणि मंत्रोच्चार अशा भारलेल्या वातावरणात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा आज पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. (sanjay raut’s daughter engagement with malhar narvekar)

आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांखेरीज काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला. साखरपुडा होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले होते.

पांरपारिक पोषाख

साखरपुड्यासाठी पूर्वशी आणि मल्हार खास मराठमोळ्या वेषात आले होते. पूर्वशी यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. त्यांनी हातात शेला धरला होता. तर मल्हार हे पेशावाई पेहरावात आले होते. तर, संजय राऊत आणि राजेश नार्वेकर यांनी कुर्ता, सदरा परिधान केला होता. साखरपुड्यासाठीचा स्टेज अत्यंत साधा, पण आकर्षक करण्यात आला होता. श्रीगणेशाच्या आकृतीच्या पृष्ठभूमीवर फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नमय झालं होतं.

पवार, ठाकरे, फडणवीस एकत्र

पूर्वशी आणि मल्हार यांचा आज दुपारी साखरपुडा पार पडला. संध्याकाळी अनेक मान्यवर या दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यानिमित्ताने हे सर्व दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्याला रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या शिवाय मराठी आणि सिनेसृष्टीतील काही कलाकारही उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आकर्षक निमंत्रण पत्रिका

राऊत यांनी कन्येच्या साखरपुड्यानिमित्ताने आकर्षक निमंत्रण पत्रिका छापली होती. गुलाबी रंगाची ही निमंत्रण पत्रिका अधिकच उठावदार दिसत होती. पूर्वशी यांच्या नावातील अद्याअक्षर असलेलं ‘पी’ आणि मल्हार यांच्या नावातील ‘एम’ हे अद्याक्षर घेऊन ‘पीएम’ असा ठळक उल्लेख या निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. त्यामुळे पत्रिका उघडताच ‘पीएम’ ही अद्याक्षरे सर्वांची लक्ष वेधून घेतात. त्यानंतर वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची नावे दिसतात. नंतर पूर्वशी आणि मल्हार यांची नावं असून त्यांचा साखरपुडा होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर मल्हार यांच्या मातोश्री सीमा आणि वडील राजेश नार्वेकर यांची नावे आहेत. नंतर साखरपुड्याची तारीख आणि स्थळ देण्यात आलं आहे. तसेच निमंत्रकांमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, संदीप राऊत आणि सविता राऊत यांची नावे छापण्यात आली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे चिरंजीव

मल्हार नार्वेकर हे उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांचे वडील राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. नार्वेकर हे कर्तव्यदक्ष आणि मितभाषी अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे. (sanjay raut’s daughter engagement with malhar narvekar)

संबंधित बातम्या:

पॉवरफूल संजय राऊतांचे जावई कोण आहेत?; व्याही काय करतात?

राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!

संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा

(sanjay raut’s daughter engagement with malhar narvekar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.