Waqf board scam| मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या, त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार; सोमय्यांचा दावा

घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात पाय मारत आहेत. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावा सोमय्यांनी केला आहे.

Waqf board scam| मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या, त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार; सोमय्यांचा दावा
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 1:31 PM

मुंबईः मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. नवाब मलिकांच्या ट्वीटनंतर सोमय्या आक्रमक झाल्यामुळे ईडीच्या कारवाईचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे खरेच काय होणार, याची उत्सुकता आहे.

मलिकांचे ते ट्वीट…

मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्वीट केल्याने सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपल्या ट्वीटमध्ये मलिकांनी सूचक भाष्य केले आहे. ते म्हणतात, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

प्रेशर करून घोटाळा लपत नाही…

किरीट सोमय्यांनी शनिवारी नवाब मलिक यांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा त्यांनी केला. मलिक हे आत्ता ट्वीट करतात. कारण त्यांना भीती वाटतेय. पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे. जमिनी ढापल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात पाय मारत आहेत. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावाही सोमय्यांनी केला.

भावना गवळी सूत्रधार

किरीट सोमय्यांनी भावना गवळी यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, भावना गवळींनी 7 कोटींची चोरी झाल्याचे सांगितले. मात्र, ते बोगस होते. याच बोगस आरोपाखाली ऊद्धव ठाकरेंनी 11 जणांना अटक केले. मात्र, आता भावना गवळी यांनाही अनिल देशमुखांच्या शेजारी आर्थर रोडला खोलीची बुकींग करावी लागणार आहे. भावना गवळींना ईडीचे तीन समन्स गेले आहेत. ईडीने त्या मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे. त्यांना लवकरच हजर होण्याचे निर्देश कोर्ट देणार आहे, असा दावा त्यांनी केला. ठाकरे सरकार कोमात जायला निघाले आहे. 4 हजारांतले 2 हजार यांच्या खिशात जात आहेत, असा दावा त्यांनी केला.

इतर बातम्याः

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

scam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.