School : दप्तराचं ओझं होणार आणखी कमी, सर्व धडे एकाच पुस्तकात, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?
दप्तदारचं ओझं जास्त असलं की विद्यार्थ्यांना नको वाटतं. यासाठी शालेय शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचाही प्रयत्न आधी केलाय. यातच आता आणखी एक संकल्पना शालेय शिक्षण विभागाने आनली आहे. आता सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. 'एकात्मिक पुस्तक ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
मुंबई : दप्तदारचं ओझं जास्त असलं की विद्यार्थ्यांना (Student) नको वाटतं. यासाठी शालेय शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचाही प्रयत्न आधी केलाय. यातच आता आणखी एक संकल्पना शालेय शिक्षण विभागाने आनली आहे. आता सर्व शाळांमध्ये (School) पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. ‘एकात्मिक पुस्तक ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे’, असे शिक्षणंत्री गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी जाहीर केलंय. राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांच्या पाठिवरील ओझे आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
काय आहे संकल्पना?
राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘एकात्मिक पुस्तक ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या नव्या संकल्पनेनूसार वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. त्या विधानसभेत बोलताना म्हणाल्या की, ‘सरकारी शाळेतील मुलांना इंग्रजीचे चांगले ज्ञान व्हावे यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी शब्दांना इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्दही असेल. त्यामुळे एकाच वेळी मुलांना वेगवेगळ्या शब्दांचा, संज्ञांचा परिचय होईल. त्यांचे इंग्रजी चांगले होण्यास मदत होईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.
शिक्षणमंत्री नेमकं काय म्हणाल्या?
शालेय शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचाही पर्यत्न आधी केलाय. यातच आणखी एक संकल्पना शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. आता सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. ‘एकात्मिक पुस्तक ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे आणखी कमी होऊ शकेल, असं शिक्षणमंत्री विधानसभेत म्हणआल्या.
इंजिनीअरिंगसाठी मोठा निर्णय
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एक दशकाच्या प्रदीर्घ मागणीनंतर एमबीए आणि इंजिनीअरिंग शिक्षणासाठी कमाल शुल्कमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार एमबीएचे एका वर्षाचे कमाल शुल्क १ लाख ५७ हजार ते 1 लाख 71 हजार रुपये दरम्यान असेल. तर इंजिनीअरिंगचे शुल्क 1 लाख 44 हजार ते 1 लाख 58 हजार रुपयापर्यंत असेल.
इतर बातम्या