AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Reopening : शाळेची घंटा वाजणार काय?; वाचा, तुमच्या जिल्ह्यात काय होणार!

नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron) धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा काही जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबर ऐवजी 10 किंवा 15 डिसेंबरला सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

School Reopening : शाळेची घंटा वाजणार काय?; वाचा, तुमच्या जिल्ह्यात काय होणार!
राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत संभ्रम
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 6:22 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) काहीसा कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय (School Reopen) घेण्यात होता. मात्र, आता नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron) धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा काही जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबर ऐवजी 10 किंवा 15 डिसेंबरला सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला शाळा सुरु होऊ शकतात, पाहूया…

नागपूर जिल्ह्यात शाळा कधी सुरु होणार?

नागपुरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 10 डिसेंबरपर्यंत सुरु होणार नाही. तशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. 10 तारखेनंतर आढावा घेऊन हा निर्णय घेतला जाणार आहे. महापालिका हद्दीतील शाळा 10 डिसेंबरनंतर सुरु होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार?

पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील शाळांची घंटा कधी वाजणार?

मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.

औरंगाबादेत 10 डिसेंबरपर्यंत वेट अँड वॉच

औरंगाबाद शहरातील शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम कायम आहे. ग्रामीण भागातील शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. तर औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याबाबत 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहिली जाणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरु करण्याबाबत हा निर्णय घेतला जाणार आहे. 10 तारखेला परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलीय.

नाशिक जिल्ह्यात काय निर्णय होणार?

नाशिक जिल्ह्यात शाळांबाबत 10 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाणार आहे. पहिली लाट येत असताना जी काळजी घेतली गेली तशाच पद्धतीने काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

सोलापूर शहरातील शाळा उद्यापासून सुरु

सोलापूर शहरातील प्राथमिक शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर पालिका आयुक्तांनी उशिरा निर्णय घेतला. शहरातील 368 शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. सकाळी 11 वाजाता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग उद्या सुरु होणार आहे. तसे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्यातील प्राथमिक शाळा उद्यापासून सुरु होणार

वाशिम जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून शहरी भागातदील 1 ली ते 7 वी आणि ग्रामीण भागातील 1 ली ते 5 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरु करण्याची तयारी झाली आहे. पालकांनीही मुलांना शाळेत जाण्यासाठी सहमती पत्र दिले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 1 ली ते 7 वीच्या एकूण 979 शाळा, तर 8 वी ते 12 वीच्या 363, अशा एकूण 1 हजार 342 शाळा उघडल्या आहेत.

इतर बातम्या :

‘केवळ नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी’, भास्कर जाधवांचा पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल

‘2024 ला भाजप स्वबळावर सत्तेत येणार’, देवेंद्र फडणवसींच्या दाव्याची नवाब मलिकांकडून खिल्ली

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.