पुण्याची राजकीय पॉवर, पुण्याला सात खासदारानंतर केंद्रात वजन वाढणार, एकाच परिवारात तीन खासदार

सात खासदारांनी आपल्या पॉवरचा वापर केल्यास पुणे जिल्ह्याचा विकास सुसाट होणार आहे. पुणे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. कारण सात खासदार अन् एक केंद्रीय मंत्री पुण्याकडे आहेत. मेट्रोचा विस्तार, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नदी सुधार, एमआयडीसी हे विषय मार्गी लागणार आहे. रिंग रोडचा रखडलेला विषय सुटण्याची शक्यता आहे. 

पुण्याची राजकीय पॉवर, पुण्याला सात खासदारानंतर केंद्रात वजन वाढणार, एकाच परिवारात तीन खासदार
पवार कुटुंबातील खासदार
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 8:49 AM

पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदार संघ आहे. पुणे शहर, मावळ, शिरुर आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झाली. त्यात महायुतीचे दोन तर महाविकास आघाडीचे दोन खासदार विजयी झाले. पुणे शहरातून भाजपचे मुरलधीर मोहोळ पहिल्यांदा लोकसभेवर गेले आहे. ते सरळ केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत. बारामतीमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. मावळमधून महायुतीमधील शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत. तर शिरुरुमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.अमोल कोल्हे विजयी झाले आहेत.

पुण्याचे राजकीय वजन वाढणार

राज्यसभेत पुणे जिल्ह्यातून तीन खासदार आहेत. शरद पवार राज्यसभेचे खासदार आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी राज्यसभेवर खासदार झाल्या आहेत. तसेच आता सुनेत्रा पवार राज्यसभेवर जात आहेत. त्यामुळे लोकसभेतील चार आणि राज्यसभेतील तीन खासदार पुणे जिल्ह्यातून जात आहे. पुण्यातून सात खासदार झाल्यामुळे पुण्याचे राजकीय वजन वाढणार आहे. तसेच राज्यात आतापर्यंत कोणत्याही जिल्ह्यातून सात खासदार झाले नाही. तो विक्रम पुणे जिल्ह्याच्या नावावर झाला आहे.

एकाच परिवारातील तीन खासदार

पुण्यात सात खासदार होत असताना आणखी एक विक्रम होत आहे. एकाच परिवारातून आणि एकाच गावातील तीन जण खासदार होत आहे. पवार कुटुंबातील तीन जण खासदार होत आहे. शरद पवार राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून आल्या आहेत. तसेच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार होत आहे. अजित पवार राज्यात मंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत.

हे सुद्धा वाचा

आता सात खासदारांनी आपल्या पॉवरचा वापर केल्यास पुणे जिल्ह्याचा विकास सुसाट होणार आहे. पुणे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. कारण सात खासदार अन् एक केंद्रीय मंत्री पुण्याकडे आहेत. मेट्रोचा विस्तार, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नदी सुधार, एमआयडीसी हे विषय मार्गी लागणार आहे. रिंग रोडचा रखडलेला विषय सुटण्याची शक्यता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.