जेव्हा शरद पवारच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा ‘जनता दरबार’ घेतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार अमूक तमूक मंत्र्यांचा 'जनता दरबार' पार पडणार आहे... असं राष्ट्रवादीकडून रोज सांगितलं जातं. (sharad pawar organise janta darbar to review performance of minister)

जेव्हा शरद पवारच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा 'जनता दरबार' घेतात...
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 7:05 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार अमूक तमूक मंत्र्यांचा ‘जनता दरबार’ पार पडणार आहे… असं राष्ट्रवादीकडून रोज सांगितलं जातं. त्यानुसार मंत्र्यांचा जनता दरबारही भरतो. तक्रारी ऐकून घेऊन त्याचं निराकरणही केलं जातं. आजही जनता दरबार भरला… पण आजचा जनता दरबार नेहमी प्रमाणे जनतेचा नव्हता. आज मंत्र्यांनी दरबार भरवला नाही… तर चक्क शरद पवार यांनीच मंत्र्यांचा जनता दरबार घेतला. मंत्र्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या कामाचा आढावाही घेतला. त्यामुळे पवारांचा हा आगळावेगळा दरबार आज चक्क चर्चेचा विषय ठरला आहे. (sharad pawar organise janta darbar to review performance of minister)

शरद पवार आज दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, खासदार श्रीनिवास पाटील आदी सर्वच मंत्री उपस्थित होते. कोरोनाचं संकट कमी झाल्यापासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दर आठवड्याला जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी मंत्र्यांकडून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. तसेच ज्या समस्या तात्काळ सोडवणं शक्य आहे, त्या तात्काळ तिथल्या तिथे सोडवल्या जातात. मंत्र्यांनी गेल्या महिनभरात कोणकोणत्या समस्या सोडवल्या, त्याचे स्वरुप काय? जनता दरबारात कोणत्या समस्या अधिक मांडल्या गेल्या? त्या सोडवल्यात का? आदी माहिती पवारांनी यावेळी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राजकीय हवेचा अंदाज जाणून घेण्यासाठी…

जनता दरबारातील समस्यांवरून राज्यातील जनतेच्या समस्या समजून येतात. राज्यात कोणते प्रश्न अधिक भेडसावत आहेत? ते कळतं. शेतकरी, तरुण, महिला, दलित आणि आदिवासी आदींच्या समस्याही समजून येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता आणि राज्यातील वातावरणाचा अंदाज घेणं सोपं जातं. त्यामुळेच पवारांनी आज मंत्र्यांचा दरबार भरवून राज्यातील वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (sharad pawar organise janta darbar to review performance of minister)

पवार नेहमीच माहिती घेतात

पवार साहेबांना मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याची सवय आहे. मंत्री कार्यरत आहेत का? जनता दरबार कसा सुरू आहे? याची माहिती ते घेत असतात. तिच माहिती त्यांनी आज घेतली, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. काल मंत्रिमंडळाने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचा बांधकाम व्यावसायिकांना चांगाल फायदा होईल. चलनातील पैसा हाच या व्यवसायात असतो, असं सांगतानाच कालच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांना टीका करण्यासाठीच विरोधात बसवलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नोटीस बजावल्याचं मला आत्ताच तुमच्याकडून कळलं आहे, असं सांगत आव्हाड यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. (sharad pawar organise janta darbar to review performance of minister)

संबंधित बातम्या

मंत्र्यांची कामगिरी ते मनपासाठी फिल्डिंग, राष्ट्रवादीची बैठक, सर्वात आधी शरद पवार हजर

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याच्या तयारीवर सोनिया गांधी नाराज : सूत्र

विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट अखेर जप्त, वडेट्टीवार म्हणतात…

(sharad pawar organise janta darbar to review performance of minister)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.