Sharad Pawar : शरद पवार यांचा राजीनामा तीन दिवसांनंतर मागे

| Updated on: May 06, 2023 | 7:01 AM

NCP Chief Sharad Pawar Resigns LIVE News and Updates : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Sharad Pawar :  शरद पवार यांचा राजीनामा तीन दिवसांनंतर मागे

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही पवार यांनी माघार घेतलेली नाही. अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक होणार आहे. त्यात पवार यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीत एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामासत्र सुरूच आहे. बुलढाण्यात 80 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 May 2023 09:29 PM (IST)

    गृह मंत्रालयाचा निर्णय, मणिपूरमध्ये कलम 355 नाही होणार लागू

    मणिपूर हिंसाचार संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. गृहमंत्री शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूर हिंसाचाराचा आढावा घेतला. गृह मंत्रालयाने निमलष्करी दलाच्या 10 अतिरिक्त तुकड्या मणिपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये कलम 355 वापरण्यात येणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

  • 05 May 2023 08:48 PM (IST)

    काँग्रेसच्या स्नेहल जगताप उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार

    काँग्रेसच्या स्नेहल जगताप उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार

    स्नेहल जगताप यांच्याकडून ठाकरेंच्या महाडमधील सभास्थळाची पाहणी

    संघर्षकाळात ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे राहण्याचा निर्णय

  • 05 May 2023 08:20 PM (IST)

    शरद पवारांच्या निर्णयाचं अजित पवारांकडून स्वागत

    शरद पवारांचा अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा

    शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआची ताकद वाढेल

    विरोधकांच्या एकजुटीला आणखी बळ मिळेल

    शरद पवारांनी आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर निर्णय घेतलाय

  • 05 May 2023 08:09 PM (IST)

    शरद पवारांचा राजीनामा मागे, बुलढाण्यात कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

    पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर बुलढाण्यात मोठा जल्लोष

    पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला उत्साह

  • 05 May 2023 07:17 PM (IST)

    नाशिक : पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा घेतल्यानंतर जल्लोष

    मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    फटाके फोडून, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद

    भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

  • 05 May 2023 06:58 PM (IST)

    भंडारा : शरद पवार यांच्या निर्णयाचे नाना पटोले यांच्याकडून स्वागत

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत – नाना पटोले

    प्रत्येकाला आपआपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार

    नाना पटोले यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

  • 05 May 2023 06:30 PM (IST)

    बारामती : बारामतीत राष्ट्रवादीचा जल्लोष

    कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून शरद पवारांच्या निर्णयाचं स्वागत

    बारामतीतील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांचा जल्लोष

    शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  • 05 May 2023 06:29 PM (IST)

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

    शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर जल्लोष

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला जाणार

    शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा होणार

  • 05 May 2023 06:15 PM (IST)

    Sharad Pawar Live : अजित पवार यांना अगोदर सांगितला निर्णय

    अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयाची अगोदर दिली माहिती

    अजित पवार यांना सर्वात अगोदर असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले

    शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

  • 05 May 2023 06:11 PM (IST)

    Sharad Pawar Live : कोणाला जायचे असेल तर थांबवू शकत नाही

    पक्ष सोडून जाण्याच्या तयारी असणाऱ्यांवर केली स्पष्ट भूमिका

    काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी मांडेल मत

    पत्रकार परिषदेनंतर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासह पुढील कार्यक्रम केला जाहीर

  • 05 May 2023 06:06 PM (IST)

    Sharad Pawar Live : मविआवर काही फरक पडणार नाही

    महाविकास आघाडीवर पक्षाच्या घडामोडींचा परिणाम नाही

    आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार

    शरद पवार यांचे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य

  • 05 May 2023 06:04 PM (IST)

    Sharad Pawar Live : अजितदादांच्या अनुपस्थितीवरुन वेगळा अर्थ काढू नका

    पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या अनुपस्थिती

    कोणी नाही, याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

    शरद पवार यांनी दिले स्पष्टीकरण

    भाकरी फिरवणार होतो, पण ती भाकरीच आता थांबली आहे

    भाकरी फिरण्याच्या प्रश्नावर शरद पवार यांचे उत्तर

  • 05 May 2023 06:01 PM (IST)

    Sharad Pawar Live : पक्षामध्ये काही संघटनात्मक बदल होणार

    शरद पवार यांनी मांडली भूमिका

    राजीनामा देण्याच्या निर्णयाला विरोध होईल, हे माहिती होते

    पण इतकी तीव्र भावना उमटेल, याचा विचार केला नव्हता

    तरुणाईला नेतृत्वाची संधी मिळावी यासाठीच हा निर्णय घेतला होता

  • 05 May 2023 05:59 PM (IST)

    Sharad Pawar Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच

    पत्रकार परिषदेत अजित पवार नसल्याबाबत विचारणा

    हा निर्णय घेताना सर्वच नेते होते-शरद पवार

    समविचारी पक्षाच्या लोकांनी आग्रह धरला

    2 मे रोजी दिला होता शरद पवार यांनी राजीनामा

  • 05 May 2023 05:52 PM (IST)

    Sharad Pawar Live : पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली

    शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याची केली घोषणा

    पण उत्तराधिकारी असणे आवश्यक असल्याच्या मतावर ठाम

    पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निर्णयाने भारावून गेलो-पवार

    प्रफुल पटेल देत आहेत निर्णयाची इंग्रजीतून माहिती

  • 05 May 2023 05:50 PM (IST)

    Sharad Pawar Live : उत्तराधिकारी असणं आवश्यक आहे

    शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला मागे

    पक्ष वाढविण्यासाठी अधिक जोमाने काम करेल

    नवीन नेतृत्व घडविण्यावर माझा भर असेल -शरद पवार

  • 05 May 2023 05:48 PM (IST)

    Sharad Pawar Live : शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष

    शरद पवार यांनी स्वीकारले अध्यक्षपद

    आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही

    आपल्या प्रेमामुळे, विश्वासामुळे मी भारावून गेलो आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा निर्णय अव्हेरला नाही

  • 05 May 2023 05:46 PM (IST)

    Sharad Pawar Live : माझ्या निर्णयाच्या तीव्र भावना उमटल्या

    निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी हितचिंतक, कार्यकर्ते यांनी आवाहन केले

    विविध पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घेण्याची विनंती केली

    लोक माझी सांगती हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे

  • 05 May 2023 05:44 PM (IST)

    Sharad Pawar Live : पवार काय निर्णय घेता याकडे लक्ष

    निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता

    66 वर्षांपासून राजकारण, सामाजिक जीवनात

    सर्वच जबाबदारीतून मुक्त होण्याची भूमिका होती

    निर्णयामुळे जनमाणसात तीव्र भावना उमटली

    शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु

  • 05 May 2023 05:37 PM (IST)

    Sharad Pawar Live : शरद पवार हे काय बोलतात याकडे लक्ष

    थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात

    शरद पवार यांचे जोरदार स्वागत

    शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचले

    पवार काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष

  • 05 May 2023 05:34 PM (IST)

    Sharad Pawar : शरद पवार यांचे जोरदार स्वागत

    कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, फुलांचा केला वर्षाव

    कार्यकर्त्यांनी घातला गराडा, ढोलताशांचा आवाज घुमला

    अनेक दिग्गज नेते वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचले

    ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद

  • 05 May 2023 05:32 PM (IST)

    Sharad Pawar : शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरवर

    शरद पवार यांच्यासह प्रतिभाताई, नातू रोहित पवार

    सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख उपस्थित

    इतर ही अनेक दिग्गज नेते वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचले

    ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद

  • 05 May 2023 05:27 PM (IST)

    Sharad Pawar : आता थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद

    शरद पवार यांचा ताफा रवाना

    अवघ्या 3-4 मिनिटांत पवार वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल होतील

    सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

    फुलांची उधळण करुन पवार यांचे स्वागत करण्यात येणार

    अनेक मोठे नेते पण वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचले

  • 05 May 2023 05:21 PM (IST)

    Sharad Pawar : नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवार यांची गरज

    2024 मध्ये मोदी सरकारविरोधात शरद पवार हेच लढा देतील

    राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

    वाय. बी. चव्हाण सेंटरसमोर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

    पवार यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचेच लक्ष

  • 05 May 2023 05:16 PM (IST)

    शरद पवार वाय. बी. सेंटरकडे रवाना

    सिल्व्हर ओक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

    पवार थोड्याच वेळात वाय. बी. चव्हाण सेंटरकडे

    पवार यांचा ताफा आता थेट निघाला

    पवार यांच्या निर्णयाकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणी राज्याचे लक्ष

  • 05 May 2023 05:13 PM (IST)

    थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद

    पवार निर्णय मागे घेणार का, याविषयीचा निर्णय लवकरच

    वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    पवार साहेब काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष

    अनिल देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया

  • 05 May 2023 05:02 PM (IST)

    वाय बी चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    पवार निर्णय मागे घेतील या बातमीनंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

  • 05 May 2023 04:49 PM (IST)

    आम्ही पवार साहेबांना विनंती केली आहे, त्यांनीच अध्यक्षपदावर रहावं – जयंत पाटील

    सर्व समितीतील सदस्यांनी शरद पवार यांना विनंती केली

    आम्ही आजच त्यांना निर्णय घोषित करावा अशी विनंती केली

    शरद पवार काय निर्णय घेणार याची कल्पना नाही

    कोणत्याही परिस्थितीत पवारांनीच अध्यक्ष रहावं

    नवीन चेहरे पुढे यावेत ही पवारांची इच्छा

    पक्षाचं काम करत राहणार हे पवारांनी सांगितलंय

    पक्षात फूट पडणार या वावड्यांमध्ये अर्थ नाही

    अजित पवार आमच्या पक्षाचे मोठे आधारस्तंभ

    गेली 24 वर्षे आम्ही एकत्र काम करतोय

    अजितदादांनीही ठरावातील मत व्यक्त केलं

    सर्वांनी आग्रहाने भूमिका मांडली, अजित दादाही या भूमिकेशी सहमत होते

  • 05 May 2023 04:46 PM (IST)

    जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी चकमकीत लष्कराचे 5 जवान शहीद

    चकमक सुरूच, परिसरात इंटरनेट बंद

    जम्मू प्रदेशातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला

    यानंतर या भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी ही कारवाई

  • 05 May 2023 04:44 PM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथे 40 फूट कंटेनर पलटला

    कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ब्रेक मारल्याने कंटेनर पलटला

    पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

    सुमारे पाच तासानंतर कंटेनर बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत

  • 05 May 2023 04:39 PM (IST)

    शरद पवार संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार

    वाय बी चव्हाण येथे शरद पवार पत्रकार परिषद घेणार

    पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

  • 05 May 2023 04:28 PM (IST)

    जनतेच्या मनातल्या भावना ओळखून साहेबांनी निर्णय घेतला – जितेंद्र आव्हाड

    शरद पवार बोलल्यानंतर माझी दुसऱ्या क्षणाला प्रतिक्रिया होती की शरद पवारांना अशा प्रकारे राजीनामा देता येणार नाही

    ते जनमनाला मानणारे नेते आहेत

    सामुदायिक शक्तींचा विचार करून नेत्याला दोन पाऊल मागे जावं लागलं तरी चालेल

    पण नेत्याने जनमनाचा विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे असं शरद पवार स्वतः म्हणाले

    त्यानंतर देशभरात वादळ उठलं

    महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले नेते या भारतीय संविधानाबाबत फार संवेदनशील आहेत

    त्या सगळ्यांचे म्हणणे होते शरद पवार यांनी राजीनामा नाही दिला पाहिजे

    जनमताचा विचार करता शरद पवार साहेब एकटे असा निर्णय घेऊच शकत नाही

    भारतातला सर्वात मोठा जनाधार असलेला अनुभव असलेला सध्याचा नेता जर कोणी असेल तर ते शरद पवार

    ते मर्यादित स्वतः पुरते नाहीत

  • 05 May 2023 04:11 PM (IST)

    निलेश राणे यांनी घातपात करण्याचे विधान केले ते गांभीर्याने घेणे गरजेचे – विनायक राऊत

    हिंमत असेल तर गावात जाऊन लोकांशी संवाद साधा

    रिफायनरीच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चावर विनायक राऊत यांचा सामंत, राणे यांना टोला

    फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही

  • 05 May 2023 03:58 PM (IST)

    बेळगाव येथील बेन्नळी गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा निषेध

    खानापूर तालुक्यातील गर्ल कुंजी गावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण प्रचारावर आले होते

    त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवते त्यांचा निषेध केला कार्यकर्त्यांची धरपकड करत पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली

    बेळगाव येथील बेन्नळी गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा निषेध

    महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हिब्बळकर यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न

  • 05 May 2023 03:50 PM (IST)

    सांगली: भुयारी ड्रेनेज चेंबर सफाईचे काम करणार चक्क रोबोट!

    महापालिका क्षेत्रातल्या भुयारी ड्रेनेज चेंबर सफाईचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करणार नाहीत

    आता हे काम चक्क रोबोट करणार

    या अत्याधुनिक “रोबोटचा” लोकार्पण सोहळा कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि यांच्या हस्ते संपन्न

  • 05 May 2023 03:40 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका आहे- देवेंद्र फडणवीस

    स्वतःच बारसूला प्रकल्प व्हावा असं पत्र लिहायचं

    स्वतः तिथं जाऊन लोकांना चिथावणीखोर वक्तव्य करायची

    उद्धव ठाकरे यांचा विकास विरोधी चेहरा समोर आला आहे

    उद्धव ठाकरे यांना समाजाशी, विकासाशी देणं घेणं नाही- देवेंद्र फडणवीस

    निव्वळ राजकारण करायचं त्यासाठी दुसऱ्यांचे खांदे वापरायचे

    आता त्यांना बारसूच्या लोकांचा खांदा मिळाला आहे- – देवेंद्र फडणवीस

  • 05 May 2023 03:25 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे- देवेंद्र फडणवीस

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे- देवेंद्र फडणवीस

    कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे

    त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची

    पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ

    हे सगळं स्क्रिप्टेड होतं असं मी म्हटलं नाही- देवेंद्र फडणवीस

  • 05 May 2023 03:10 PM (IST)

    बेळगाव: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खानापूर मध्ये दाखवले काळे झेंडे

    महाराष्ट्र एकीकरण समितीने काळी झेंडे दाखवत दिला अशोक चव्हाण चलेजाव चा नारा

    महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करायला आल्यानं अशोक चव्हाण यांच्या विरोधात एकीकरण समितीचा संताप

    काल देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आज अशोक चव्हाण यांनाही दाखवले काळे झेंडे

    खानापुरातील काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जात असताना घडला प्रकार

  • 05 May 2023 02:39 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका – देवेंद्र फडणवीस

    स्वतःच बारसूला प्रकल्प व्हावा असं पत्र लिहायचं आणि स्वतः तिथं जाऊन लोकांना चिथावणीखोर वक्तव्य करायची – देवेंद्र फडणवीस

    उद्धव ठाकरे यांचा विकास विरोधी चेहरा समोर आला आहे – देवेंद्र फडणवीस

    उद्धव ठाकरे यांना समाजाशी, विकासाशी देणं घेणं नाही – देवेंद्र फडणवीस

    निव्वळ राजकारण करायचं त्यासाठी दुसऱ्यांचे खांदे वापरायचे – देवेंद्र फडणवीस

    आता त्यांना बारसूच्या लोकांचा खांदा मिळाला आहे – देवेंद्र फडणवीस

  • 05 May 2023 02:37 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट | देवेंद्र फडणवीस

    कलाकार देखील अंतर्गत आहेत, पटकथा देखील अंतर्गत आहे

    त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची

    पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेंव्हा यावर प्रतिक्रिया देऊ

    हे सगळं स्क्रिप्टेड होतं असं मी म्हटलं नाही…

  • 05 May 2023 01:57 PM (IST)

    शरद पवार यांचा हा पावर गेम आहे – संजय शिरसाठ

    छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे

    आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे.

    शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे.

    शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

    मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

    अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल.

  • 05 May 2023 01:52 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांना बारसू मध्ये जाण्याची परवानगी मिळाली

    मुंबई : उद्या उद्धव ठाकरे बारसू येथील शेतकऱ्यांना भेटणार

    उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये जाण्याची परवानगी मिळाली

    उद्धव ठाकरे यांना यापूर्वी परवानगी नाकारली होती

    उद्या बारसू येथे भाजपचे नेतेही रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याची माहिती

  • 05 May 2023 01:39 PM (IST)

    शरद पवार यांनी अध्यक्ष निवड समितीचं म्हणणं ऐकून घेतलं – जयंत पाटील

    मुंबई : शरद पवार यांच्याकडे अध्यक्ष निवड समितीचा प्रस्ताव दिला

    शरद पवार यांना लवकर निर्णय घेण्याची विनंती केली

    निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी वेळ मागितला

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

  • 05 May 2023 01:37 PM (IST)

    शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ

    मुंबई : शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर अध्यक्ष निवड समिती सिल्व्हर ओकवर पोहचली होती

    त्यानंतर सर्व नेत्यांनी प्रतिक्रिया दिली मात्र, अजित पवार यांनी गाडीची काचेला पडदा लावून घेतला

    छगन भुजबळ, जयंत पाटील, अनिल देशमुख या सर्व नेत्यांनी प्रतिक्रिया दिली मात्र अजित पवार यांनी बोलणं टाळलं

  • 05 May 2023 01:32 PM (IST)

    तातडीनं निर्णय घेण्याची शरद पवार यांना विनंती – प्रफुल्ल पटेल

    मुंबई : शरद पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला

    शरद पवार यांनीच अध्यक्ष पदी राहण्याचा ठराव केला

    समितीचा ठराव शरद पवार यांच्याकडे देण्यात आला

    तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी अध्यक्ष निवड समितीने केली आहे

  • 05 May 2023 01:30 PM (IST)

    शिवसेना जसा पक्ष तसाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – संजय राऊत

    मुंबई : शरद पवार यांच्या शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दूसरा पर्याय नाही

    शरद पवार हाच पक्षाचा चेहरा आहे, आणि त्यांच्या नावावरच पक्ष चालतो

    शरद पवार पक्षाचे अध्यक्ष राहिले नाही तर मोठा परिणाम होईल

    राजकारणाचे भीष्म पितामह म्हणून शरद पवार यांची ओळख आहे

    संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • 05 May 2023 01:16 PM (IST)

    शरद पवार यांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षि होतं – राऊत

    मुंबई : शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

    शरद पवार यांनीच अध्यक्ष पदी राहावं अशी भावना सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या आहेत

    देशभरातील भावना पोहचल्या तश्या उद्धव ठाकरे यांच्याही भावना पोहचल्या आहे

    राजीनामा फेटाळणे हे योग्य केलं, शरद पवार यांच्याशिवाय दूसरा पर्याय नाहीच

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • 05 May 2023 01:13 PM (IST)

    अध्यक्ष निवड समितीचा निर्णय नेत्यांनी शरद पवारांना सांगितला

    मुंबई : शरद पवार यांनीच अध्यक्ष पदी कायम राहावे अशी मागणी करण्यात आली

    कार्याध्यक्षपदाचा प्रस्ताव फेटाळून लावत अध्यक्ष समितीने एकमताने निर्णय घेतला

    अध्यक्ष निवड समितीकडून शरद पवार यांना अध्यक्षपदी राहावे यासाठी आग्रह धरला जात आहे

  • 05 May 2023 01:03 PM (IST)

    शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स कायम

    मुंबई : शरद पवार यांचा राजीनामा अध्यक्ष निवड समितीकडून नामंजूर

    अध्यक्ष निवड समितीकडून शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहावे असा ठराव मंजूर

    ठराव मंजूर झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह निवड समिती सिल्व्हर ओकेवर दाखल

    अध्यक्ष निवड समितीकडून शरद पवार यांनीच अध्यक्ष पदी राहावे यासाठी आग्रह केला जाणार

    सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग

  • 05 May 2023 12:44 PM (IST)

    अजित पवार, प्रफुल्ल पटेल ‘सिल्वर ओक’वर दाखल

    शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष रहाणार हा निवड समितीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

  • 05 May 2023 12:44 PM (IST)

    पक्षाला बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत – जयंत पाटील

    – कुणाचेही काही वेगळे मत नव्हते.

    – चाको यांनी देशातल्या वेगळ्या राज्यात स्थानिक लोक किती आग्रहाने मागणी करतात याची माहिती दिली.

    – देशातील विविध नेत्यांनी आता ही वेळ नाही, लोकसभापर्यंत हा निर्णय घेऊ नये असे सांगितले.

    – पवार यांच्याशिवाय अन्य पर्याय नाही.

    – हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे.

    – पवार साहेब बाजुला होणे हाच धक्का होता.

    – काल संध्याकाळी चर्चा केली तोपर्यंत ते ठाम होते.

    – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समितीच्या निर्णयासोबत असतील.

    – महाविकास आघाडी अभेद्य राहील

    – हा आमचा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे. तो आमच्या पक्षाचा निर्णय आहे.

    – महाविकास आघाडीवर याचा काहीही परिणाम होणार नाही.

    – पक्षाला बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत.

  • 05 May 2023 12:27 PM (IST)

    शरद पवार यांचा निर्णय काय ? उत्सुकता शिगेला

    – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने नामंजूर केला.

    – निवड समितीचा हा निर्णय आता शरद पवार यांना कळविण्यात येणार आहे.

    – निवड समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे शरद पवार म्हणाले होते.

    – मात्र, निवड समितीने निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार हे काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 05 May 2023 12:18 PM (IST)

    साहेबांची वेळ घेऊन विनंती करणार आहोत – धनंजय मुंडे

    – समितीची शिफारस पवार साहेबाना कळविली जाणार आहे.

    – प्रफुल्ल पटेल, फौजिया खान, अजित पवार, जयवंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह सर्व नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

    – निवड समितीच्या नेत्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

    – एकमताने जे काही ठरले आहे. त्याबाबतीत साहेबांची वेळ घेऊन विनंती करणार आहोत

    – निवड समितीच्या बैठकीनंतर नेते निघाले शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहोत.

  • 05 May 2023 12:09 PM (IST)

    निवड समितीच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

    – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा निवड समितीने नामंजूर करण्यात आला.

    – यानंतर प्रदेश कार्यालयाबाहेर जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

    – फटाके फोडून आणि फुले उधळून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

    – नाचत आणि फुगड्या घालत महिला कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत आहेत.

  • 05 May 2023 12:02 PM (IST)

    BREAKING : शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर – प्रफुल्ल पटेल

    – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी कोणावर सोपवावी यासाठी शरद पवार यांनी एका समितीचे गठन केले होते.

    – आज कमिटीने या बैठकीमध्ये सर्वानुमते एक ठराव पारित केला आहे.

    – हा ठराव तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे. त्यानंतर आम्ही ही भावना हा ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू

    – आम्ही त्यांना भेटून विनंती करणारा आहोत.

    – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या राजीनामा देण्याच्या मनोदय व्यक्त केला होता. पण, पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे.

    – त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.

  • 05 May 2023 11:59 AM (IST)

    पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर – प्रफुल्ल पटेल

    पक्षाध्यक्षपदी शरद पवारांनी कायम राहावे – प्रफुल्ल पटेल

    प्रफुल्ल पटेल यांनी ठराव वाचून दाखवीला

  • 05 May 2023 11:55 AM (IST)

    प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद सुरू

    राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल कोणालाच कल्पना नव्हती-  प्रफुल्ल पटेल

    पवारांच्या अनुभवाचा देशाच्या राजकारणाला फायदा-   प्रफुल्ल पटेल

    पवारांच्या कामाचं कौतुक देशभरात होत आहे – प्रफुल्ल पटेल

  • 05 May 2023 11:54 AM (IST)

    Expensive Share : हा आहे भारतातील सर्वात महागडा स्टॉक

    या शेअरची किंमत एक लाखांच्या घरात

    कोणती आहे ही कंपनी, काय आहे उत्पादन

    गेल्या दोन दिवसांपासून शेअरमध्ये जोरदार उसळी

    या कंपनीला झाला फायदा जोरदार

    कंपनी गुंतवणूकदारांना मोठा लाभांश देणार, वाचा सविस्तर 

  • 05 May 2023 11:48 AM (IST)

    प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषद घेणार

    प्रफुल्ल पटेल प्रस्ताव वाचून दाखवणार

  • 05 May 2023 11:41 AM (IST)

    कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीसांची मानवी साखळी

    राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्ते आक्रमक

    भिवंडी जिल्हा अध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न

    कार्यकर्त्यांनी दिले रक्ताने लिहीलेले पत्र

  • 05 May 2023 11:37 AM (IST)

    लोकसभा निवडणूक होईपर्यंत पवार यांनी नेतृत्व करावे – संजय राऊत

    – विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हावी यासाठी शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे.

    – अशावेळी ते पक्षात नसतील तर थोडी अडचण निर्माण होऊ शकते

    – देशाचे सध्याचे वातावरण पाहता त्यांनी आपल्या निर्णयाचा थोडासा फेरविचार करावा.

    – देशाच्या प्रमुख नेत्यांनीही त्यांना विनंती केली आहे.

  • 05 May 2023 11:35 AM (IST)

    शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहचणार

    निवृत्तीचा निर्णय शरद पवारांनी मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा रोष

    लवकरच राष्ट्रवादीची पत्रकार परिषद

    शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली

  • 05 May 2023 11:31 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

    – मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर अनेक कार्यकर्ते जमा झाले आहेत.

    – राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

    – मात्र, बाजूच्या कार्यकर्त्याने त्याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

  • 05 May 2023 11:30 AM (IST)

    पवारांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

    राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर धक्कादायक प्रकार

    राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

    कार्यकर्ते आणि पोलील आमने सामने

  • 05 May 2023 11:27 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आत्मदहणाचा प्रयत्न

    कार्यकर्त्याचा धक्कादायक प्रकार

    कार्यकर्त्याचा गदारोळ

  • 05 May 2023 11:25 AM (IST)

    शरद पवार यांचा राजीनामा समितीने नाकारला

    शरद पवारांच्या निवृत्तीच्या प्रस्तावावर अखेर निर्णय झाला

    व्हाय बी सेंटरमध्ये शरद पवारांना निर्णय कळवणार

  • 05 May 2023 11:23 AM (IST)

    मोठी बातमी : शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला

    – निवड समितीचा निर्णय मान्य असेल असे शरद पवार म्हणाले होते.

    – शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष रहाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

    – निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे.

    – यासंदर्भात नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रस्ताव मांडला होता.

  • 05 May 2023 11:20 AM (IST)

    जयंत पाटील राष्ट्रवादीच्या बैठकीला रवाना

    मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात होणार बैठक

    प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले

    पवारांचा राजीनामा नामंजुर करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार

  • 05 May 2023 11:17 AM (IST)

    शरद पवार हेच अध्यक्ष रहावेत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मांडला प्रस्ताव

    – राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक आज संपन्न होत आहे.

    – या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हेच अध्यक्ष रहावेत असा प्रस्ताव मांडला आहे.

    – पवार पुन्हा अध्यक्ष व्हावेत असा दुसरा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला.

  • 05 May 2023 11:15 AM (IST)

    थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक

    राष्ट्रवादिचे नेते प्रफुल्ल पटेल प्रस्ताव मांडणार

    शरद पवारांनी निवृत्ती घेतली तर देशाच्या राजकारणाचे बारा वाजतील- जितेंद्र आव्हाड

    शरद पवारां राजीनाम्याला जितेंद्र आव्हाडांचा कडाडून विरोध

  • 05 May 2023 11:05 AM (IST)

    गडूशेठ गणपतीला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य, ससून रुग्णालयात प्रसाद वाटप

    गडूशेठ गणपती मंदिरात शहाळे मोहत्सवाचं आयोजन

    मंदिर परिसरात भक्तांची गर्दी

    वैशाख वनव्यापासून भक्तांचं संरक्षण व्हावे ही यामगची भावना

  • 05 May 2023 11:02 AM (IST)

    Hero Share : हेच गुंतवणूकदार ठरले ‘Hero’

    Splendor विकून कंपनीला झाला तगडा नफा

    प्रत्येक शेअरवर झाली 100 रुपयांची कमाई

    कंपनीने वर्षभरात केले मालामाल, वाचा बातमी 

  • 05 May 2023 10:54 AM (IST)

    कल्याण : स्विफ्ट गाडीतून गाईंची तस्करी, एक आरोपी ताब्यात

    गुंगीचे औषध देत बेशुद्ध झालेल्या गाईंना स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन सुरू होती तस्करी

    कल्याण बाजारपेठ पोलिसांनी छापा मारून एक आरोपीला ताब्यात घेत 2 गाईंची केली सुटका

    पोलिसांना पाहून 5 आरोपी झाले फरार

    बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 05 May 2023 10:49 AM (IST)

    मुंबई : थोड्याच वेळात सुरू होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची बैठक

    शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर आज होणार निर्णय

    अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी पक्षाच्या समितीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे

  • 05 May 2023 10:45 AM (IST)

    पुणे : आंतरराष्ट्रीय व्यंग चित्र महोत्सवासाठी राज ठाकरे उपस्थित

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले अजित पवार यांचे व्यंगचित्र

    माझी रत्नागिरीला सभा आहे, त्यासाठी मी पुण्यातूनचं जाणार होतो, मात्र मध्येच टोल भरायला लावला – राज ठाकरे

    व्यंगचित्र म्हटल्यावर येणं स्वाभाविक होतं , शांतता मिळत नसल्यानं मी काढत नाही

    काही काही व्यंगचित्र भाषणातून बाहेर पडतात

    मी चित्रात रमणारा माणूस आहे

    आज फक्त शुभेच्छा द्यायला आलो आहे

  • 05 May 2023 10:38 AM (IST)

    नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणात विरोधक पुन्हा एकत्र येणार

    17 आणि 18 मे ला बिहारच्या पाटण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची बोलावली बैठक

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे बैठकीत सहभागी होणार

    कर्नाटक राज्याच्या निकालानंतर विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक

    ममता बॅनर्जी,  मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल , अखिलेश यादव , सिताराम येचुरी यांनाही बैठकीचे निमंत्रण

  • 05 May 2023 10:31 AM (IST)

    मुंबई : सुप्रिया सुळे, जयंत पाटील बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे झाले रवाना

    शरद पवारांनी निवृत्तीची केलेली घोषणा मागे घ्यावी, असा प्रस्ताव आजच्या बैठकीत प्रफुल पटेल मांडणार आहेत

    जितेंद्र आव्हाडही NCP कार्यालयात पोहोचले

  • 05 May 2023 10:12 AM (IST)

    संजय बनसोडे, रुपाली चाकणकर जयंत पाटलांच्या भेटीला

    संजय बनसोडे, रुपाली चाकणकर यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर घेतली भेट

  • 05 May 2023 10:10 AM (IST)

    Gold Silver Price Today : सोने-चांदीत पुन्हा दरवाढ

    तीन दिवसांत किंमतीत एक हजार रुपयांची वाढ

    अमेरिकन डॉलरचा बाजारावर दबाव

    3 मेपासून सोने-चांदीच्या किंमती सुसाट

    आज सकाळच्या सत्रात इतका वाढला भाव, वाचा बातमी 

  • 05 May 2023 10:04 AM (IST)

    मुंबई : NCP कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

    अजित पवार NCP कार्यालयात पोहोचले

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची 11 वाजता होणार बैठक

  • 05 May 2023 10:03 AM (IST)

    Pakistan Religious Conversion : पाकिस्तानात इतक्या हिंदुंना मुस्लिम बनवलं, धर्मांतराचा ‘काळा खेळ’

    Pakistan Religious Conversion : पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदु कुटुंबांना इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडल्याच समोर आलय. पाकिस्तान त्यांच्या देशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मूग गिळून बसतो. वाचा सविस्तर…..

  • 05 May 2023 10:02 AM (IST)

    ODI World cup 2023 : भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs PAK वर्ल्ड कपचा महामुकाबला

    ODI World cup 2023 : किती तारखेपासून सुरु होणार ODI World cup 2023? या शहरातील प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. वाचा सविस्तर…..

  • 05 May 2023 10:02 AM (IST)

    KL Rahul Injury : IPL मधून आऊटच, WTC Final पर्यंत फिट होईल का? NCA मधून समोर आली आतली बातमी

    KL Rahul Injury : केएल राहुलबाबत NCA मधून काय बातमी आलीय?. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर आधीच दुखापतग्रस्त आहेत. आता केएल राहुलची दुखापत टीम इंडियासाठी झटका आहे. वाचा सविस्तर….

  • 05 May 2023 10:01 AM (IST)

    Mumbai Indians IPL 2023 : विकत घेऊन संपूर्ण सीजन बसवलं, त्यानेच मुंबई इंडियन्सशी घेतला बदला

    Mumbai Indians IPL 2023 : त्याने मुंबईच्या बॉलर्सना ठोकून काढलं. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला विकत घेतलं होतं. पण या टॅलेंटेड प्लेयरला संधी दिली नाही. आता तो पंजाबकडून धमाकेदार खेळ दाखवतोय. वाचा सविस्तर….

  • 05 May 2023 09:58 AM (IST)

    त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगसाठी पैसे लागणार

    नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे खाजगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना आता शहरात वाहन उभे करण्यासाठी तासानुसार पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी पालिकेकडून वार्षिक ठेका 45 लाख रुपयांना देण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासन शहरात ‘नो पार्किंग’चे फलक लावणार असून, तिथे वाहन उभे करणाऱ्यांना दंड आकारला जाणार आहे.

  • 05 May 2023 09:50 AM (IST)

    DRDO च्या अधिकाऱ्याला तपासासाठी पुणे एटीएस कार्यालयात आणले

    पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे अधिकारी अटक प्रकरण

    DRDO च्या अधिकाऱ्याला तपासासाठी पुणे एटीएस कार्यालयात आणण्यात आला आहे

    काल या अधिकाऱ्याला ATS अधिकाऱ्यानी ताब्यात घेतलं होत

    पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाला हनी ट्रॅप प्रकरणी काल केली होती

  • 05 May 2023 09:42 AM (IST)

    तापमान कसे राहणार

    मे महिना आला तरी ऊन तापत नाही. अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. तापमानातील बदलासंदर्भात हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. या सर्वांचा परिणाम शेतीवर होणार आहे…वाचा सविस्तर

  • 05 May 2023 09:35 AM (IST)

    शरद पवार यांनी केला खुलासा

    Sharad Pawar Autobiography : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या सुधारित आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी झाले. त्यात त्यांनी आतापर्यंत उजडेत न आणलेले अनेक पैलू उघड केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचाही खुलासा केला आहे…वाचा सविस्तर

  • 05 May 2023 09:30 AM (IST)

    WhatsApp Loan : आता सहज मिळणार कर्ज

    कर्ज घेण्यासाठी बँकेत नको येरझरा

    तुमच्या व्हॉट्सअपला लावा कामाला

    सहज होणार कर्जाचा पुरवठा

    या ग्राहकांना मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज

    या कंपनीने आणली ग्राहकांसाठी खास योजना, वाचा बातमी 

  • 05 May 2023 09:30 AM (IST)

    32 जोडप्यांचा विवाह सोहळा

    जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे एका फाउंडेशनच्या वतीने 32 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. त्यामुळे 32 जोडप्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या सोहळ्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 05 May 2023 09:21 AM (IST)

    राष्ट्रीय राजकारणात विरोधक पुन्हा एकत्र येणार

    17 आणि 18 मे ला बिहारच्या पाटण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची बोलावली बैठक

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे बैठकीत सहभागी होणार

    कर्नाटक राज्याच्या निकालानंतर विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक

    ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल , अखिलेश यादव , सिताराम येचुरी यांनाही बैठकीचे निमंत्रण

  • 05 May 2023 09:15 AM (IST)

    श्रीरामपूरमध्ये आकर्षक नंबरची मागणी वाढली

    श्रीरामपूर आरटीओची कोटयवधींची कमाई

    व्हिआयपी नंबरसाठी वाहन धारकांनी मोजले तीन कोटी रुपये

    1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत तीन कोटी रुपये परिवहन विभागास मिळाले

    घरबसल्या ऑनलाइन बुकींगमुळे व्हिआयपी नंबर मिळवणे झाले सोपे.

  • 05 May 2023 09:07 AM (IST)

    नवी मुंबईत मेट्रो निओ

    नवी मुंबईत सिडकोने स्टॅर्डड गेज मेट्रोच्या जागी मेट्रो निओचा पर्याय निवडला आहे

    ट्रॉलीवर आधारीत या मेट्रोचे रुळ हे रबरचे असणार आहेत

    अनेक विकसित देशात वाहतूकीचे प्रमुख साधन असलेली ही मेट्रो निओ अधिक आरामदायी व पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था मानली जात आहे.

  • 05 May 2023 09:01 AM (IST)

    पुण्यात तुफान हाणामारी

    पुणे हडपसर भागात टोईंग कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात तुफान हाणामारी,

    महादेवनगर येथील दुकानदार रमेश बराई यांना वाहतूक शाखेने नेमलेल्या कर्मचार्‍यांकडून मारहाण

    रमेश बराई यांना टोईंग कर्मचाऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत केली मारहाण

    यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

  • 05 May 2023 08:50 AM (IST)

    The Kerala Story Review | केरळमधल्या तरुणींची अंगावर काटा आणणारी कहाणी

    ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आजपासून थिएटरमध्ये प्रदर्शित

    लव्ह-जिहाद, धर्मांतर, दहशतवाद.. कसा आहे ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट?, वाचा सविस्तर..

  • 05 May 2023 08:46 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या कोकणात सभा

    दौऱ्याची सुरुवात होणार पुण्यातून

    सकाळी मनसेकडून राज ठाकरेंच जंगी स्वागत

    बालगंधर्व सभागृहात व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाला लावणार हजेरी

    त्यानंतर राज ठाकरे आज रत्नागिरीकडे होणार रवाना

    कोथरूडमध्ये होणार राज ठाकरेंचं स्वागत

  • 05 May 2023 08:42 AM (IST)

    Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाची पुन्हा गिरकी

    अमेरिकन डॉलरच्या दबावापुढे इलाज चालेना

    जागतिक बाजारात क्रूड ऑईलमध्ये किंचित दरवाढ

    राज्यातील सर्वच शहरात पेट्रोल-डिझेलच्या भावात नाही मोठा बदल

    तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, वाचा सविस्तर 

  • 05 May 2023 08:35 AM (IST)

    पुणे | श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

    गणेशजन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन

    ससून रुग्णालयात होणार प्रसाद वाटप

    शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता शहाळे महोत्सवाचे आयोजन

    11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला

  • 05 May 2023 08:23 AM (IST)

    Entertainment News Live | सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

    सुशांतचा ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

    येत्या 12 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, वाचा सविस्तर..

  • 05 May 2023 08:18 AM (IST)

    पुणे | राज्यात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं

    पुण्यातील सायबर विभागात दरवर्षी 18 ते 20 हजार तक्रारी होतात दाखल

    त्यामध्ये बँक फसवणूक, सेक्सटॉर्शन, क्रीप्टोकरन्सी फसवणूक अशा तक्रारी येतायेत

    दररोज सरासरी 50 ते 55 तक्रारी सायबरमध्ये नोंद होतात

  • 05 May 2023 08:07 AM (IST)

    अमरावतीत सिटी बस सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागण्याची शक्यता

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती शहर बस प्रकरणी केली काल सुनावणी

    मनपा प्रशासन, कर्ज देणारी बँक, नवीन बस कंत्राटदार यांनी एकत्र बसून तोडगा काढण्याचे न्यायालयाचे आदेश

    न्यायालयाला आता एक महिना सुट्टी असल्याने या प्रकरणा निकाल एक महिन्या नंतरच लागण्याची शक्यता

  • 05 May 2023 07:50 AM (IST)

    साहेबांशिवाय पर्याय नाही… ठाण्यात लागले पोस्टर्स

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

    जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी ठाण्यात पोस्टर लावून पवारांकडे केली राजीनामा मागे घेण्याची मागणी

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचं आवाहन

  • 05 May 2023 07:16 AM (IST)

    बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बालकांनी घेतली श्रामणेर दीक्षा, नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाला सुरवात

    बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला बुद्ध महोत्सवात 100 च्यावर बालकांनी श्रामणेर दीक्षा घेतली

    दीक्षाभूमी इथल्या बुद्ध जयंती महोत्सवात तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाने चालण्याची दीक्षा भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांनी दिली.

    यावेळी लहान बालकांनी केस काढून अंगावर काशाय वस्त्र धारण करत त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले

    यावेळी बालकांनी भिक्खू आणि पालकांचे आशीर्वाद घेत दीक्षा घेतली

  • 05 May 2023 07:14 AM (IST)

    अमरावती आणि बडनेरा शहर परिसराचा पाणी पुरवठा उद्या सायंकाळी राहणार बंद

    पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाच्या अत्यावश्यक दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने पाणी पुरवठा राहणार बंद

    सिंभोरा येथील 900 अश्वशक्ती व्हीटी पंपाच्या दुरूस्तीचे काम केले जाणार

    पाणी जपून वापरण्याचे मजीप्राचे आवाहन

  • 05 May 2023 07:13 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत पाणी कपात लागू!

    कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी

    9 मे पासून ऑगस्ट अखेरपर्यंत दर मंगळवारी पाणी पुरवठा राहणार बंद

    धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका हद्दीत पाणी कपात लागू

  • 05 May 2023 07:11 AM (IST)

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केल्यावरही राजीनामा सत्र सुरूच

    बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांना दिले पदाचे राजीनामे

    जिल्ह्यातील 13 तालुक्यातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे दिलेत राजीनामे

    सर्व राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात आल्याची जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची माहिती

  • 05 May 2023 07:10 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांचं चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन

    राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तो फक्त स्वतःच्या घरातील सांगून, मात्र इतरांना विश्वासात न घेता राजीनामा दिला

    संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, या भावनेतून बलवंत थिटे यांनी आपल्या शेतातील चिंचेवर चढून सत्याग्रह सुरू केलाय

    शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याने यापूर्वी शरद पवार हे पंतप्रधान व्हावे म्हणून 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून शरद पवार यांचे पंतप्रधान पदासाठी समर्थन केले होते

    बलवंत थिटे यांनी केलेल्या अनोख्या सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे

  • 05 May 2023 07:09 AM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची दाट शक्यता

    आज सकाळी 11 वाजता मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या संबंधित कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता

    याच बैठकीत शरद पवार यांना पक्षाचे एकमेव सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून नेमले जाण्याची शक्यता

    या बैठकीत शरद पवार यांची जागा कोण चालवणार हे निश्चित होण्याची शक्यता आहे.

    शरद पवार यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निर्णय घेईल, असे चित्र उभे केले जाईल

    त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसं वाटेल आणि नव्या नेतृत्त्वालाही संधी मिळेल, असे बोललं जातंय

  • 05 May 2023 07:06 AM (IST)

    शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर आज अंतिम फैसला, समितीची बैठक

    अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे

    त्यात पवार यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात येणार आहे

    या समितीत एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.

Published On - May 05,2023 7:03 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.