विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार निवृत्त होणार का? केवळ दोन शब्दांत हे दिले उत्तर
Sharad Pawar First Reaction After Election Results: विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला जागा जास्त जागा मिळाल्या आहेत. हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
Sharad Pawar First Reaction After Election Results: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निकालाचे विश्लेषण केले. विरोधकांकडून होत असलेल्या निवृत्तीच्या चर्चेवर सडेतोड उत्तर दिले. ईव्हीएमसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेशी विरोधी भूमिका घेतली. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर उत्तर दिले. कराडमधून पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
निवृत्तीबाबत काय म्हणाले…
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. आता त्यांचे वय ८३ झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरद पवार निवृत्ती होणार? ही चर्चा सुरु झाली. त्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी दोन शब्दांत उत्तर दिले. माझ्या निवृत्तीची वेळ विरोधकांनी सांगू नये.
निकालाचे असे केले विश्लेषण
शरद पवार यांनी निकालाचे विश्लेषण करताना मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनाचा उल्लेख केला. ते म्हणाले, लाडक्या बहिणांना काही रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही सत्तेत आलो नाही तर ही योजना बंद होईल, असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्यामुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केले, असे वाटते. दुसरीकडे या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरुन दिसत आहे. तो फायदा महायुतीला मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. त्याचा फायदा महायुतीला झाला.
ईव्हीएमवर शरद पवार म्हणाले…
उद्धव ठाकरे यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर काही बोलणार नाही. महाराष्ट्रात निवडणुकीसाठी आलेले ईव्हीएम मध्य प्रदेशातून आल्याची चर्चा असल्याचे शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर शरद पवार म्हणाले, ईव्हीएम मध्य प्रदेशातून आले की गुजरातमधून यासंदर्भात जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला जागा जास्त जागा मिळाल्या आहेत. हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.