शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, सुषमा अंधारे सुखरुप

sushma andhare helicopter crash: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे. या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, सुषमा अंधारे सुखरुप
helicopter crash
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 10:31 AM

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे. या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत. तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले. हेलिकॉप्टर कोसळण्याची दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहेत.

सुषमा अंधारे अन् पायलट सुखरुप

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज ते बारामतीकडे जाणार होत्या. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले. परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे.

तांत्रिक बिघाडामुळे अपघात

तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीनंतर अपघाताचे कारण समोर येणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सकाळी सकाळी 9.30 वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. परंतु त्यापूर्वी अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारे बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टर कोसळले

सर्वांच्या शुभेच्छामुळे सुखरुप- सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, एका दिवसांत दोन, तीन सभा घ्याव्या लागत आहेत. कोकणातील सभेनंतर बारामतीकडे जाण्यासाठी आम्ही हेलिपॅडवर आला. कारमधून आम्ही खाली उतरलो होतो. त्यावेळी हेलिकॉप्टरने दोन, तीन घिरट्या मारल्या आणि आचानक हेलिकॉप्टर कोसळले. मी आणि विशाल गुप्ते या हेलिकॉप्टरने जाणार होतो. परंतु सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सर्व सुखरुप आहोत, असे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

कोण आहेत सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक आहेत. त्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आहेत. पुरोगामी विचारांच्या त्या आहेत. राजकारणासोबत त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेत असतात.

...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....