Balasaheb Sanap: भाजपचं इनकमिंग उद्धव ठाकरेंनी रोखलं? बाळासाहेब सानपांची नाराजी दूर करण्यात यश?

भाजपच्या वाटेवर असलेले शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षात थोपवून धरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आल्याचं बोललं जात आहे. (shivsena leader balasaheb sanap met cm uddhav thackeray)

Balasaheb Sanap: भाजपचं इनकमिंग उद्धव ठाकरेंनी रोखलं? बाळासाहेब सानपांची नाराजी दूर करण्यात यश?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 10:16 AM

नाशिक: भाजपच्या वाटेवर असलेले शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षात थोपवून धरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सानप यांनी चर्चा केली असून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याने ऐन नाशिक पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात होणारी बंडाळी थोपविण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. शिवाय सानप यांना पक्षात आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खिळ बसल्याचंही राजकीय निरीक्षक सांगत आहेत. (shivsena leader balasaheb sanap met cm uddhav thackeray)

राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पराभवाला सामोरे जावं लागल्याने सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. नाशिकच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सानप यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. शिवाय नाशिक पालिकेतील भाजपच्या सत्तेला सानप सुरुंग लावतील अशी आशा होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे सानप हे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणात नव्हते. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. त्यामुळे नाशिक पालिकेतील सत्ता हातातली जाण्याची शक्यता असल्याने सानप यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सानप यांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावेळी नाशिक महापालिकेच्या अनुषंगाने चर्चा झाली असून उद्धव ठाकरे यांनी सानप यांच्याकडे मोठी जबाबदारी देणार असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीसह महामंडळाचं अध्यक्षपद देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी सानप यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

टार्गेट पंचवटी

सानप हे पंचवटीमध्ये राहतात. या भागात एकूण 24 नगरसेवक असून यात शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक आहे. त्यामुळे सानप यांच्या माध्यमातून पंचवटीतून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचंही सांगण्यात येतं. या भागातील मनसे आणि भाजपचं आव्हान मोडून काढण्यासाठी सानप चांगली भूमिका वठवू शकतात, त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाकडून अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राऊतांची मध्यस्थी?

शिवसेना नेते संजय राऊत नुकतेच नाशिकला गेले होते. यावेळी सानप आणि राऊत यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर काल सानप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट घडवून आणण्यासाठी राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (shivsena leader balasaheb sanap met cm uddhav thackeray)

सानपांची धरसोड वृत्ती

गेल्या वर्ष दोन वर्षात सानप यांनी दोन पक्ष बदलले. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आधी ते भाजपमध्ये गेले. मात्र, तिथे त्यांचं विधानसभेचं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादीतून निवडणूक लढवूनही यश न आल्याने ते पुन्हा शिवसेनेत आले. पण शिवसेनेतही मोठी जबाबदारी नसल्याने ते काहीसे अडगळीत गेल्यासारखे होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणर असल्याची चर्चाही होती. मात्र, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सानप चर्चेत आले आहेत. (shivsena leader balasaheb sanap met cm uddhav thackeray)

संबंधित वृत्त:

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ काळाच्या पडद्याआड; मोहन रावले यांचे निधन

महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

(shivsena leader balasaheb sanap met cm uddhav thackeray)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.