Sindhudurg Bank Election Result | आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी पार पडली असून या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. ही निवडणूक नारायण राणे अर्थात भाजपने जिंकत महाविकास आघाडीला धूल चारली आहे.

Sindhudurg Bank Election Result | आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी
नितेश राणे, सतीश सावंत आणि नारायण राणे
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 5:21 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी पार पडली असून या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. ही निवडणूक नारायण राणे अर्थात भाजपने जिंकत महाविकास आघाडीला धूल चारली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे.  जिल्हा बँकेसाठी 98.67 टक्के मतदान झाले होते. तर महाविकास आघाडीचे सहकार समुद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समुद्धी पॅनल रिंगणात होते.

19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात

जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले होते. 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी माध्यमिक शिक्षक पतपेढीत पार पडली. या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली गेली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एकूण 19 जागांपैकी 10 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला  आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय भाजपचा जल्लोष

महाविकास आघाडीचा पराभव, राणेंची सरशी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष राणेंच्या ताब्यात होती. मात्र 2019 साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली होती. याचे फळ अखेर राणे यांना मिळाले आहे. आता या बँकेवर भाजपची सत्ता असेल.

निकाल काय?

भाजपचे प्रकाश बोडस विजयी भाजपचे दिलीप रावराणे विजयी भाजपचे मनीष दळवी विजयी भाजपचे महेश सारंग विजयी भाजपचे अतुल काळसेकर विजयी भाजपचे विठ्ठल देसाई विजयी भाजपचे बाबा परब विजयी भाजपचे समीर सावंत विजयी भाजपचे गजानन गावडे विजयी

महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी

इतर बातम्या :

मोठी बातमी : ओबीसी आरक्षण वगळून 18 महापालिका निवडणुका, मार्चअखेरीस धुरळा

मनी लॉण्ड्रिंग प्रकरण: येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह पत्नी बिंदू यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.