शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत, ते नेहमी बिनधास्त… नारायण राणे यांचा खोचक टोला

narayan rane on sharad pawar: मी काही लोकांचा अभ्यास केला आहे. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत, ते नेहमी बिनधास्त... नारायण राणे यांचा खोचक टोला
narayan rane and sahrad pawar
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 10:17 AM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान असलेल्या मतदार संघात बड्या बड्या नेत्यांच्या सभा होत आहे. ऊन तापत असताना आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही तापत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच पुण्यात सभा झाली होती. या सभेत त्यांनी शरद पवार भटकती आत्मा असल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला होता. मी स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे, असा हल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. महागाईबाबत भूमिका मांडताना 100 वेळा अस्वस्थता दाखवेन, असे ते म्हणाले होते. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नारायण राणे

सिंधुदुर्गमध्ये बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते. ते अस्वस्थ कधीच नसतात. ते बिनधास्त असतात. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बारा वर्ष केंद्रीय मंत्री राहिले. संरक्षण मंत्री दोन वर्षे राहिले. त्यानंतरही काहीच करु शकले नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक पद भोगली तरी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आता अस्वस्थपणा का जाणवतो, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

मित्र म्हणू नका, पण….

मी काही लोकांचा अभ्यास केला आहे. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत. ते नरेंद्र मोदी यांना म्हणतात, तुमचे सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही. परंतु आमचे सरकार जाणार नाही. आता आमचे 400 खासदार निवडून येणार आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

एकीकडे मोदी साहेब शरद पवार यांना मित्र म्हणतात. परंतु दुसरीकडे शरद पवार नेहमी त्यांच्यावर टीका करतात. मित्राला चांगले म्हणता येत नाही तर नका म्हणू. परंतु वाईट तरी नको बोलू, असा टोला नारायण राणे यांनी शरद पवार यांना लगावला.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.