धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांनाच पत्रं

गायिका रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Singer Renu Sharma Accuses Maharashtra Minister Dhananjay Munde of Rape)

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांनाच पत्रं
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 9:11 PM

मुंबई: गायिका रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही रेणू शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी मुंडेंवर केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Singer Renu Sharma Accuses Maharashtra Minister Dhananjay Munde of Rape)

ओशिवरा पोलिसांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर रेणू शर्मा यांनी पोलीस आयुक्तांच्या नावे एक पत्रं लिहिलं असून त्याची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे. या पत्रात त्यांनी मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्यावर बलात्कार करून माझं शारीरिक शोषण केलं. त्यामुळे मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, असं शर्मा यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

या पत्रात रेणू शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. माझी बहीण करुणा हिच्या घरी इंदोर येथे माझी ओळख झाली. करुणा आणि मुंडे या दोघांनीही 1998मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र 2006मध्ये माझी बहीण बाळंत झाल्यावर इंदोरला गेली होती. त्यावेळी मी घरीच एकटी होते. हे मुंडेंना माहीत होते. तरीही ते घरी आले आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर प्रत्येक दोनतीन दिवसांनी येऊन त्यांनी माझ्याशी संबंध प्रस्तापित केले, असं रेणू यांनी म्हटलं आहे. (Singer Renu Sharma Accuses Maharashtra Minister Dhananjay Munde of Rape)

बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचं अमिष

जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असंही त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. (Singer Renu Sharma Accuses Maharashtra Minister Dhananjay Munde of Rape)

संबंधित बातम्या:

बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांनाच पत्रं

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

(Singer Renu Sharma Accuses Maharashtra Minister Dhananjay Munde of Rape)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.