भाजप, प्रहारमधील कार्यर्ते ठाकरे गटात; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास, कार्यकर्त्यांच्या भावना

आगामी काळातील निवडणुकीवर याचा नेमका काय परिणाम होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र त्याचबरोबर याचवेळी ठाकरे गटाला या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बळ मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.

भाजप, प्रहारमधील कार्यर्ते ठाकरे गटात; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास, कार्यकर्त्यांच्या भावना
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:52 PM

सोलापूरः राज्यात शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेलेले असतानाच आणि राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघाले आहे. आम्हीच खरे शिवसैनिक म्हणत ज्या शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह घेतले. त्यांच्याच मित्र पक्षातील सोलापुरात भाजपासह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे आता सोलापूरच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार की नाही ते आता आगामी काळातील निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

माजी आमदार रविकांत पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोलापूर जिल्ह्यामधील भाजप आणि प्रहार पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटालाही बळ मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एका भाजप आणि प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चेना आता उधान आले आहे.

भाजप आणि प्रहारमधील राजकीय कार्यकर्त्यांनी भाजपासह प्रहार संघटनेला दक्षिण सोलापूर तालुक्यात धक्का बसला आहे.

आगामी काळातील निवडणुकीवर याचा नेमका काय परिणाम होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र त्याचबरोबर याचवेळी ठाकरे गटाला या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बळ मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील या राजकीय पक्षप्रवेशामुळे टाकरे गटाला बळ मिळणार असले तरी पक्षप्रवेशानंतर या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही आपली भावना व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोलापूचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील, नूतन शिवसेना जिल्हाप्रमूख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमूख भिमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हा प्रमूख संतोष केंगनाळकर संतोष पाटील व युवासेना जिल्हाप्रमूख बालाजी चौगुले, दक्षिण विधानसभा संघटक राजू बिराजदार, राहुल गंधारे, संतोष घोडके, शिवसेना तालुकाप्रमूख योगीराज पाटील, युवासेना तालुकाप्रमूख धर्मराज बगले, उपजिल्हा प्रमूख आकाश गंगदे , निंगराज हुळ्ळे, आप्पासाहेब व्हनमाने, संतोष बरूरे , संदीप मेंडगुदले, बिरू वरवटे यांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापुरचे प्रहार तालूका अध्यक्ष सिध्दाराम काळे, मेंबर मंद्रुपचे शहर प्रमुख प्रहार उस्मान भाई नदाफ, हाजीमलंग नदाफ, सदस्य दिगंबर मरिआईवाले यांच्यासह दक्षिणमधील सर्व प्रहारचे व भाजपचे सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.