“राज ठाकरे म्हणजे राजकारणातले जोकर”; कालच्या सभेवरून ठाकरे गटाची सडकून टीका

तुम्ही महाराष्ट्राच खाऊन गुजरातचे तळवे चाटण्याचे काम करत असल्याचा घणाघातही त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा दादा भुसे यांना काडीमात्र अधिकार नाही असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.

राज ठाकरे म्हणजे राजकारणातले जोकर; कालच्या सभेवरून ठाकरे गटाची सडकून टीका
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:49 PM

सोलापूर : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची काल अलोट गर्दीत सभा झाली. राज ठाकरे यांनी या सभेत उद्धव ठाकरे यांच्यापासून ते अगदी एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संबंधावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महाबळेश्वर दौऱ्यावर असताना पक्ष प्रमुख पद, शिवसेनेची सत्ता आली तर मुख्यमंत्री पद घेण्याच्या विषयावरून झालेली चर्चा आणि त्याबद्दल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यावरून आता ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे म्हणजे राजकारणातले जोकर असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली आहे.

यावेळी शरद कोळी यांनी सांगितले की, आम्हाला राज ठाकरे यांच्याबद्दल आदर होता तो केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे होते म्हणून आदर होता मात्र हल्ली ते भाजपच्या संपर्कात असल्यामुळेच त्यांच्याकडून अशी टीका केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे हे ज्यांचे सरकार असते त्यांच्यासारखंच बोलतात त्यामुळे ते स्वतः न बोलता भाजपच त्यांच्या तोंडून बोलते असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

शरद कोळी यांनी मंत्री दादा भुसे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, दादा भुसे यांना एकच विनंती आहे. तुम्ही इकडे तिकडे लक्ष घालू नका. तुमचे उरले-सुरलेले मंत्री पदाचे चार दिवस आहेत ते जनतेच्या कामासाठी उपयोगी वापरा. त्याठिकाणी तुम्ही लक्ष घाला अशी टीका त्यांनी दादा भुसे यांच्यावर त्यांनी केली आहे.

तर संजय राऊत हे खातात मातोश्रीचे आणि गातात पण मातोश्रीचेच असं म्हणत त्यांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन केले आहे. पण तुम्ही खाल्लेल्या मिठाला आणि भाकरीलाही जागला नाहीत असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे. तुम्ही जिथे खाल्लात त्याच अन्नात माती टाकण्याचे काम आणि पापही तुम्ही केलं असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तुम्ही महाराष्ट्राच खाऊन गुजरातचे तळवे चाटण्याचे काम करत असल्याचा घणाघातही त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा दादा भुसे यांना काडीमात्र अधिकार नाही असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मोठं मोठ्या राजकार्त्यांना त्यात राज ठाकरे देखील यांना उद्धव साहेबांचे नाव घेतल्या शिवाय त्यांचे पक्ष चालत नाहीत. त्यामुळे जर मनसे टिकवून ठेवायची असेल तर उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावेच लागेल. तरच राज ठाकरे यांचे राजकारण पुढं चालेल, त्यामुळेच ते बोलतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.