“ओबीसी के सन्मान में,भाजप मैदान में”; काँग्रेसविरोधात भाजपचा एल्गार..

राहुल गांधी चोर है अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत. ओबीसी के सन्मान में, भाजप मैदान मे अशा घोषणा देत राहुल गांधी यांचा फोटो फाडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

ओबीसी के सन्मान में,भाजप मैदान में; काँग्रेसविरोधात भाजपचा एल्गार..
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 8:47 PM

सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता राज्यातील काँग्रेस आणि भाजप आक्रमक झाली आहे. एकीकडे काँग्रेसने आपण वर्षभर मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे सांगत आता भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आता राज्यातील विविध जिल्ह्यात भाजपकडून निदर्शनं आणि जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे.

सोलापूरातही भाजपकडून जोरदार आंदोलन पुकारून ओबीसी के सन्मान में, भाजप मैदान मैं म्हणत काँग्रेसविरोधात भाजपने एल्गार पुकारला आहे.

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदरकीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आ्रता काँग्रेस ज्याप्रमाणे आक्रमक झाले आहे त्याच प्रमाणे भाजपही आक्रमक झाले आहे.

त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून जोरदार निदर्शनं करून राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उलटा फोटो पकडून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

यावेळी राहुल गांधी यांच्या निषेधाच्याही घोषणा देण्यात आल्या. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेस महिला पदाधिकाऱ्यांकडून जोडेही मारण्यात आले.

एकीकडे काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनाथ जोरदार आवाज उठवला आहे. तर भाजपने आता ओबीसीचा मुद्दा पुढे करून राहुल गांधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. त्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची प्रतिमा फाडून निषेध व्यक्त केला आहे.

सोलापूरातील लोकमान्य टिळक चौकात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधतही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतः राहूल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

ओबीसी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांचा भाजपकडून धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या आहेतत.

राहुल गांधी चोर है अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत. ओबीसी के सन्मान में, भाजप मैदान मे अशा घोषणा देत राहुल गांधी यांचा फोटो फाडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.