शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे ‘जय वीरू’ची जोडी, असं कोण म्हणालं…

अमृता फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, 'शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे जय वीरूची जोडी आहे.

शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे 'जय वीरू'ची जोडी, असं कोण म्हणालं...
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 9:56 PM

पंढरपूर: साऱ्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीचे अमृता फडणवीस यांनी कौतूक केले. अमृता फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे जय वीरूची जोडी आहे.

म्हणजेच ही जोडी म्हणजे ये दोस्ती हम कभी नही तोडेंगे अशा पद्धतीची त्यांची जोडी असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सांगितले.

एकादशीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी पंढरपूर दौरा केला असता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांच्या कामाचेही त्यांनी कौतूक केले.

त्यांच्या कामाची पोचपावती देत असतानाच त्यांनी शोले चित्रपटातील जय विरु या दोघांची जोडी ज्या प्रमाणे आहे. त्याच प्रमाणे शिंदे आणि फडणवीस यांची जोडी असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना वारकरी आपले दैवत आहेत, तेच आपले अन्नदाता आहेत असंही त्यांनी सांगितले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. एकादशीसारख्या उत्सवामुळे आपले राज्य वेगळे असल्याचे सांगत त्यांनी आपला महाराष्ट्र संपन्न आणि समृद्ध व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या अमृता फडणवीस यांनी एकादशीनिमित्त पंढरपुरातील वारकऱ्यांसोबत टाळ, मृदंग आणि फुगडी खेळून एकादशीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

अमृता फडणवीस यांना शिंदे आणि फडणवीस यांना जय वीरुची उपमा दिल्यामुळे त्यांच्या या वाक्याची जोरदार चर्चा होती. अमृता फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत दिंडीमध्ये सहभाग नोंदवल्यानेही त्याचीही जोरदार चर्चा झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.