SC final decision on MLA Tanaji Sawant : साखरसम्राट, शिक्षणसम्राट असले तरी आमदारकीवर टांगती तलावर; तानाजी सावंत यांना लक्ष्मीपूत्रही का म्हणतात…

Supreme Court final decision on MLA Tanaji Sawant disqualification case : आमदार कमी आणि लक्ष्मीपुत्र म्हणूनच जास्त ओळखले जातात. साखरसम्राट अशीही त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांनी आपल्या वक्तव्यांतून वादच निर्माण केले होते.

SC final decision on MLA Tanaji Sawant : साखरसम्राट, शिक्षणसम्राट असले तरी आमदारकीवर टांगती तलावर; तानाजी सावंत यांना लक्ष्मीपूत्रही का म्हणतात...
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 1:50 PM

मुंबई : आरोग्य मंत्र्याने हाफकिनला माणूस म्हटल्याचे वृत्तपत्रात छापून आले आणि नंतर सोशल मीडियावर तानाजी सावंत यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. या घटनेनंतर माध्यमांनी त्यांना तुम्ही हाफकिनला खरच माणूस म्हटला का अस विचारल्यानंतर तानाजी सावंत यांनी माध्यमांवर राग काढत माध्यमांना माझं शिक्षण किती झालं ते माहिती आहे का असा प्रतिसवाल केला होता. तानाजी सावंत यांची खरी ओळख आहे ती म्हणजे साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.

तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांचा जन्म 1 जून 1964 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला आहे.

त्यांचं मूळ गाव हे सोलापूर आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजी सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधून पदवी, त्यानंतर त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्षे कामही केलं आहे.

तानाजी सावंत यांनी 2015मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले. राजकारणाबरोबरच त्यांची खरी ओळख ही खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट असल्याचे दिसून येते.

तानाजी सावंत यांची उस्मानाबादच्या राजकारणावर चांगली पकड आहे. शिवसेनेत असताना त्यांच्यावर टीकाही होत होती. कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत सध्या त्यांना मोठे स्थान आहे.

तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी केल्यानंतर मात्र त्यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. बंडखोरीच्या कारणामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बालाजीनगर परिसरातील त्यांचे कार्यालयही फोडण्यात आले होते.

तानाजी सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतरही त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. शिवसैनिकांनी त्यांच्यावर तानाजी सांवत हे मूळ शिवसैनिक नाहीतच.

तानाजी सावंत कळीचा नारद असून या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे याची सुरुवात पुण्यापासून करत असल्याचा इशारा त्यावेळी शिवसैनिकांनी दिला होता.

त्यामुळे  शिवसैनिक नाहीत तर मग तानाजी सावंत आहेत कोण? तर मूळ शिवसैनिक नसून ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले एक नेते आहेत.

ते आमदार कमी आणि लक्ष्मीपुत्र म्हणूनच जास्त ओळखले जातात. साखरसम्राट अशीही त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांनी आपल्या वक्तव्यांतून वादच निर्माण केले होते. त्यामुळे तानाजी सावंत माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत राहिले होते.

LIVE Updates Supreme Court Decision on 16 MLA Disqualification Case Maharashtra | Shiv Sena | Eknath Shinde

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.