ऐन गणेशोत्सवात मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कळस चोरीला; मश्रूम गणपती मंदिरावरील घटना; दुसऱ्यांदा चोरीला गेला कळस

मश्रूम गणपती मंदिरावरील हा सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 2016 मध्येही गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरट्यांनी चोरला होता. त्यामुळे गणपती मंदिरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  

ऐन गणेशोत्सवात मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कळस चोरीला; मश्रूम गणपती मंदिरावरील घटना; दुसऱ्यांदा चोरीला गेला कळस
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 10:41 AM

सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपतीच्या (Mushroom Ganpati Temple)मंदिरावरील सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरली गेल्याने खळबळ माजली आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा (Solapur Hipparaga) गावामध्ये हे मश्रूम गणपतीचे मंदिर असून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येथे भाविक येत असतात. मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे, 2016 मध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच आणि वीज पुरवरठा खंडित झालेला असतानाच या मंदिरावरील कळस (dome) चोरीला गेला होता. त्यावेळीही मोठी खळबळ सोलापूर जिल्ह्यात माजली होती. आताही मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने संबंधितांवर कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कळस चोरीला

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावामध्ये हे मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून गणपतीच्या मंदिरावर हा कळस बसवण्यात आला होता. गणपती मंदिरावर असलेला सोन्याचा कळस हा 25 तोळ्याचा असून सोन्याचा कळस चोरीला गेला कसा असा सवालही भक्तांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी कसून चौकशी करुन मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील सोन्याच्या कळसाचा शोध लावून तो परत मिळवून द्यावा अशीही मागणी पुजाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे.

सिध्दरामेश्वरांनी स्थापन केला आहे मश्रूम गणपती

सोलापूर जिल्ह्यात असलेले हिप्परगामधील हे मश्रूम गणपतीचे मंदिर सिद्धरामेश्वरांनी स्थापन केले आहे. नंतरच्या काळात भाविकांनी मिळून या गणेश मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. त्याचवेळी गणपती मंदिरावरही सोन्याचा कळस लावण्यात आला होता. अनेक भाविकांचे श्रद्धास्थाने असलेल्या या मश्रूम गणपतीच्या मंदिरात चोरी झाल्याने अनेक भाविकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे या प्रकरणातील चोरट्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला

मश्रूम गणपती मंदिरावरील हा सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 2016 मध्येही गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरट्यांनी चोरला होता. त्यामुळे गणपती मंदिरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.