सोलापूरच्या जवानाला अखेरचा निरोप, रात्री दीड वाजता अख्खं गाव लोटलं, दोन महिन्यांच्या लेकाचं पितृछत्र हरपलं
जवान रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी होते. 2012 मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. नुकतेच ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते.
सोलापूर : छत्तीसगड येथे कर्तव्य बजावताना सोलापूरच्या (Solapur) बार्शीतील जवान रामेश्वर काकडे शहीद (Martyr) झाले. उपचार सुरु असताना काकडेंनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री दीड वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी पहाटे रामेश्वर काकडे (Rameshwar Kakade) यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्या वतीने देण्यात आली. शहीद रामेश्वर काकडे बीएसएफमध्ये कार्यरत होते.
जवान रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी होते. 2012 मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. नुकतेच ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते.
वडिलांकडून मुखाग्नी
छत्तीसगड येथे कर्तव्य बजावताना सोलापूरच्या बार्शीतील जवान रामेश्वर काकडे यांना वीरमरण आले. उपचार सुरु असताना काकडेंनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव बार्शीत दाखल झाले. तर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला.तर यावेळी सीआरपीएफच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली.
रात्रीच्या अंधारातही गाव लोटला
रात्री उशीर झालेला असताना देखील संपूर्ण गाव जवान रामेश्वर काकडे यांना अखेरची सलामी देण्यासाठी हजर होते. रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यावेळी जवान रामेश्वर काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
आधी भ्याड हल्ला, मग भारतीय जवानांची हत्यारंही पळवली, नक्षलवाद्यांच्या प्रेस नोटमध्ये काय मागण्या?
शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्काराला जनसागर, अमर रहेच्या घोषणा