Solapur Crime : ‘मला शिव्या का देता?’ म्हणत वकील मुलाची आई-वडिलांना काठीनं मारहाण!
Solapur Crime News : वकील मुलानं वडिलांना उद्देशून तुम्ही मला सारख्या शिव्या का देता, असं म्हणत दमदाटी केली.
सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली. एका वकील मुलानं आपल्याच आई-वडिलांना मारहाण केली. मला शिव्या का देता असं म्हणत वकील मुलानं (Lawyer Son) आपल्या आई-वडिलांना थेट काठीनं मारहाण केली. याप्रकरणी आई-वडिलांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत दाखल (Madha Police) करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वकील मुलाविरोधात गुन्हा नोंदवलाय. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुर्डू गावात ही घडना घडली. या मुलाच्या वडिलांना मुलाची मारहाण सहन न झाल्यानं अखेर पोलीस स्थानक गाठलं आणि मुलाविरोधात तक्रार नोंदवली. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकी घटना काय?
विष्णू गोविंद इंगळे असं पोलिसात तक्रार करणाऱ्या इसमाचं नाव आहे. 1 मे रोजी संध्याकाळी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यांच्या वकील मुलानंच त्यांना काठीनं मारहाण केल्यानं एकच खळबळ उडाली होती.
आधी शिवीगाळ, मग मारहाण
वकील मुलानं वडिलांना उद्देशून तुम्ही मला सारख्या शिव्या का देता, असं म्हणत दमदाटी केली. त्यानंतर शिविगाळ करणाऱ्या या मुलाच्या आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तू वडिलांना शिव्या का देतो, ते तुझे वडील असून गप्प बस असं म्हटलंय. पण संतापलेल्या मुलानं आईचंही ऐकलं नाही.
आई ढकललं आणि वडिलांना मारहलं
यानंतर संतापलेल्या मुलानं आईल ढकललं आणि जवळच पडलेल्या काठीनं वडिलांच्या डोक्यावर काठीनं प्रहार केला. भांडण सोडवण्यासाठी आईला लाथाबुक्क्यानं मारहाण केलं. तुम्ही इथं राहायचं नाही, असं म्हणत हा वकील मुलगा तिथून निघून गेला. या घटनेप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या संपूर्ण घटनेप्रकरणी वकील मुलाच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी या मुलाविरोधात गुन्हादेखील नोंद केलाय.