भीम आर्मीकडून देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला; नेमकं प्रकरण काय..?

आमच्या मागण्या 8 दिवसात मान्य केल्या नाही तर आतापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भीम आर्मी संघटनेकडून देण्यात आला आहे.

भीम आर्मीकडून देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला; नेमकं प्रकरण काय..?
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 4:55 PM

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात जोरदार निदर्शनं करून फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सोलापूरमध्ये भीम आर्मीकडून देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून हत्येचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत.

सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून हत्येचा प्रयत्न केला गेला आहे. त्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, संबंधित पोलीस अधिकारी, हेड कॉन्स्टेबल यांच्यासह आरोपी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती दखल घेतली गेली नसल्याने त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील ज्या पिडीतेवर अतिप्रसंग झाला आहे. तिच्या उदर निर्वाहासाठी 50 लाख रुपये शासनाने रक्कम देण्याची मागणी भीम आर्मी संघटनेकडून करण्यात आली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पत्नीसाठी अधिवेशनात बोलण्यासाठी वेळ आहे मात्र एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार त्यांना का दिसत नाही ? असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच तापण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्याच बरोबर आमच्या मागण्या 8 दिवसात मान्य केल्या नाही तर आतापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भीम आर्मी संघटनेकडून देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष लागून पिडीतेला न्याय मिळवून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाही गंभीर प्रकरणाची दखल सरकार घेत नाही असा आरोपही करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.