“राहुल गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक”; या जिल्ह्यात भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर
राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यामुळे या हुकूमशाही सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. मात्र देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही राहुल गांधी यांच्या सोबत आहोत असंही यावेळी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई केल्यामुळे आता काँग्रेस आणि भाजपकडूनही जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. सध्या भाजपने राहुल गांधी यांच्यानिमित्ताने ओबीसीचा मुद्दा पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत ओबीसीसाठी आता भाजप रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. तसेच काल सोलापुरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले होते.
आज काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी सोलापुरात युवक काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यामुळे आता काँग्रेस राहुल गांधी यांच्यासाठी रस्त्यावर उतरत त्यांनी भाजपविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक करून काँग्रेसने जोडो मारो आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
आज काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेलेल आंदोलन हे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी काँग्रेसकडून राहुल गांधी यांची बाजू मांडताना राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या हुकमशाही सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचे काम केल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजपवर काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्यादिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी या देशात लोकशाहीला श्रद्धांजली वाहत हुकूमशाही उदयाला आली आहे असा घणाघातही त्यांनी यावेळी केला आहे.
भाजप सरकारला सवाल केल्यामुळे आमचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याची टीकाही काँग्रेसने भाजपवर केली आहे.
भाजपच्या नेत्यांनी काल राहुल गांधी यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही आज आंदोलन केल्याचेही काँग्रेसने यावेळी सांगितले.
वास्तविक पाहता भाजपा ओबीसीच्या मुद्द्याला हात घालून राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. मात्र भाजपला यामधून ओबीसीचे राजकारण करायचे आहे, त्यासाठीच त्यांनी ओबीसीसमाजबद्दल आत्मीयता बाळगत आहेत अशी टीकीह त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यामुळे या हुकूमशाही सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. मात्र देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही राहुल गांधी यांच्या सोबत आहोत असंही यावेळी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.