जय भीम सिनेमा आठवतोय? अटकेतील आरोपीचा मारहाणीत मृत्यू! सोलापुरातील पोलिसांविरोधात गुन्हा

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

जय भीम सिनेमा आठवतोय? अटकेतील आरोपीचा मारहाणीत मृत्यू! सोलापुरातील पोलिसांविरोधात गुन्हा
पोलिसांवर हत्येचा गुन्हा?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:31 AM

सोलापूर : जय भीम सिनेमात (Jai Bhim Movie) दाखवलेल्या प्रकारसारखा प्रकार सोलापुरात घडला की काय अशी शंका आता घेतली जाते आहे. कारण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापुरात (Solapur crime) घडलेल्या या घटनेनंतर आता पोलिसांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. सध्या क्राईम ब्रांच (Solapur Crime Branch) पोलिसांकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाते आहे. चौकशीअंती पोलीस दोषी आहे निर्दोष, याबाबतचा फैसला होईल. अटकेत असलेल्या आरोपीला सोलापूर पोलिसांनी अटक केली होती. हा आरोपी पोलीस मारहाणी गंभीर जखमी झाला होता. नंतर अटकेतील गंभीर जखमी आरोपीला रुग्णालाय दाखलही करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या गंभीर जखमी अवस्थेतील आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलिसांविरोधात गुन्हा

आत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मारहाण करुन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह अन्य 5 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सप्टेंबर 2021मध्ये चोरीच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली होती.

धक्क्दायक

भीमा रज्जा काळे असं या आरोपीचं नाव होतं. या आरोपीला तपास अधिकारी कोल्हाळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच मारहाणीत जखमी झालेल्या भीमा काळेचा मृत्यू झाला असल्याची तक्रार देण्यात आली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या आरोपीवर शासकीय रुग्णालयाच उपचारही सुरु होता. मात्र उपचारादरम्यान, या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

पोलिसांवर काय आरोप?

जखमी झालेल्या भीमा काळे याचा 3 ऑक्टोबर 2021 रोजी शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. तर पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना न करणे, आरोपीला मारहाण झाल्यानंतर त्याच्या उपचारकडे दुर्लक्ष करणे, पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटिव्ही न बसवल्याचे आरोप करण्यात आले होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपधिक्षक श्रीशैल गजा यांनी सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

दिलेल्या तक्रारीवरुन आता संशयित आरोपी असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारिविरोधात 304, 330, 166, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे उपधिक्षक जी. व्ही. दिघावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. या तपासातून काय अधिक खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पाहा व्हिडीओ : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापूरमध्ये गुन्हा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.