VIDEO | माझ्या बायकोला जाऊन विचार, राऊतांच्या भxx वक्तव्यावर सोमय्या संतापले

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात उघडलेली आघाडी. तिला राऊतांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन दिलेले उत्तर. त्यानंतर पुन्हा सोमय्यांची पत्रकार परिषद. या साऱ्या ठिकाणी फक्त एकमेकांना मारहाणच शिल्लक राहीलय, इतक्या पराकोटीची एकमेकांवर टीका झाली. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

VIDEO | माझ्या बायकोला जाऊन विचार, राऊतांच्या भxx वक्तव्यावर सोमय्या संतापले
किरीट सोमय्या.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 12:56 PM

मुंबईः भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) जी भाषा वापरतात त्यावरून जोरदार टीका केली. राऊत यांना त्या शब्दांचा अर्थ कळतो का, असा सवाल केला. तो कळेतच नसेल, तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा, असे आवाहन केले. माझी बायको मराठी आहे. माझी सून मराठी आहे. राऊत यांची चोरी, लबाडी उघड होते. म्हणून ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत, असा टोलाही त्यांनी हाणला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात उघडलेली आघाडी. तिला राऊतांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन दिलेले उत्तर. त्यानंतर पुन्हा सोमय्यांची पत्रकार परिषद. या साऱ्या ठिकाणी फक्त एकमेकांना मारहाणच शिल्लक राहीलय, इतक्या पराकोटीची एकमेकांवर टीका झाली. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

वाझे दुसरे प्रवक्ते

सोमय्या आज म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सचिन वाझेंसारखा महान व्यक्ती नाही. तो सर्वात प्रामाणिक अधिकारी आहे, असं गुणगाण उद्धव ठाकरेनी केलं. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यानं वाझेचं गुणगाण गायलं आहे. राऊत हे पहिले प्रवक्ते, तर वाझे हे सेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत. माझा राऊतांबद्दल द्वेष नाही. मात्र, ही उद्धव ठाकरेंची भाषा आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

ही भाषा कसली?

सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत. कुणातही त्यावर बोलण्याची हिंमत नाही. जोडे मारण्याची भाषा दलालपासून भXXXची भाषा. राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचार. माझी बायको मराठी आहे. माझी सून मराठी आहे, बागायतकर. त्यांना जाऊन विचारा. राऊत त्यांची चोरी, लबाडी उघड होतेय म्हणून अशी भाषा करतायत का, असा सवाल त्यांनी केला.

राऊतांनी केले कौतुक

सोमय्या म्हणाले, राऊतांनी मला पत्र लिहिलं होतं. प्रिय श्री किरीट सोमय्याजी 11 ऑक्टोबर 2021. जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार, शासकीय पैशाचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण उघड केली. हे राष्ट्रावर उपकार झाले. अनेकांना तुरुंगात जावं लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावं. हे राऊत एकीकडे कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांपासून इतर लोक म्हणतात सोमय्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा.

चिटींग कोण करतं?

सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना बायकोची बाजू घ्यायची नाही? सरपंच बोलतात मग उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. 23 मे 2019, जानेवारी 2019 रोजी रश्मी ठाकरेंनी पत्र लिहिलं. त्यात त्या म्हणतात, सरपंच कोर्लई, आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांची जागा खरेदी केली असून, यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहीन. या पत्रावर रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांची नावे आहेत. सरपंचाची रिसीव्ह म्हणून सही आहे, असा दावा त्यांनी केला. 2 फेब्रुवारी 2019 रोजीही रश्मी ठाकरेंनी पत्रं लिहिलं. ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी खताद्वारे विकत घेतली आहे. आम्ही मिळकत खरेदी केली, तेव्हा कोणतेही बंगले अथवा घरे नव्हती, असे त्या म्हणतात. मग चिटींग कोण करत आहे, जनतेची फसवणूक कोण करत आहे. एकीकडे तुम्ही बंगले नाही म्हणतात. सोमय्याला जोड्याने म्हणता. मग हे पत्र काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.