तुमच्या ट्रेनच्या प्रवासावर ‘संक्रांत’ नाही! आरक्षणामुळे प्रवास होणार सुखकर, भारतीय रेल्वे विभाग चालवणार 14 विशेष रेल्वे
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आज पासून 14 विशेष संक्रांत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ही संपूर्ण रेल्वे ट्रेन आरक्षित असेल. यामध्ये फर्स्ट एसी सेकंड एसी थर्ड एसी स्लीपर कोच जनरल डब्बा अशी व्यवस्था आहे.
भारतीय नागरिकांना सण सोहळे साजरे करता यावे यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) नेहमीच योजना राबवित असते. यावेळी मकर संक्रांत साजरी करता यावी यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना अगोदरच त्यांचे तिकीट आरक्षित करता येईल. या 14 ही गाड्या आरक्षित असतील. त्यामुळे प्रवाशांचे तिकीट प्रवासापूर्वीच कन्फर्म (confirm)झालेले असेल. आज पासून या 14 विशेष संक्रांती गाड्या सुरू होत आहे. काकीनाडा शहर ते आणि लिंगमपल्ली यादरम्यान रेल्वे धावतील. तसेच या गाड्यांची सीट आरक्षित असतील. त्यामुळे यात्रेकरूंच्या प्रवाशावर संक्रांत येणार नाही.
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वेबसाईटवर 3 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या या 14 विशेष गाड्या विषयी माहिती देण्यात आलेली आहे. ती खालील प्रमाणे
काकिनाडा टाउन-लिंगमपल्ली-काकिनाडा टाउन स्पेशल
ट्रेन क्रमांक 07275/07276
ही ट्रेन तिच्या प्रवासात समालकोट,राजहमुन्द्री, निदादेवोलु, ताडेपल्लीगुडेम, एलुरु, विजयवाडा, गुंटूर, पिडुगुरल्ला, नलगोण्डा आणि सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर दोन्ही बाजूंनी थांबेल.
काकिनाडा टाउन-लिंगमपल्ली-काकिनाडा टाउन स्पेशल ट्रेन क्रमांक 07491/07492
ही ट्रेन तिच्या प्रवासात समालकोट, राजमुंदरी, निदादावोलु, तनुकु, भीमावरम टाउन, अकिविदु, कैकलूर, गुडीवाडा, विजयवाड़ा, गुंटूर, मिर्यालगुडा, नलगोंडा आणि सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर दोन्ही बाजूंनी थांबेल.
लिंगमपल्ली-काकिनाडा टाउन सुविधा स्पेशल ट्रेन
ट्रेन क्रमांक 82714
ही ट्रेन तिच्या प्रवासात सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, गुंटूर, विजयवाड़ा, गुडीवाडा, कैकलूर, अकिविदु, भीमवरम टाउन, तनुकु, निदादावोलु, राजमुंदरी आणि सामलकोट रेल्वे स्टेशनवर दोन्ही बाजूंनी थांबले.
लिंगमपल्ली आणि काकिनाडा शहरादरम्यान
चालविल्या जाणाऱ्या या स्पेशल रेल्वेत फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर और जनरल क्लास डब्बे लावण्यात येतील. या विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित असतील. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर तिकीट काढून या रेल्वेत प्रवास करता येणार नाही.
तात्काळ तिकीट विक्रीतून बक्कळ कमाई
कोरोना महामारीत रेल्वे विभागाने जबरदस्त कमाई केली. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार कोविड काळात प्रभावित असूनही रेल्वे खात्याने जोरदार कमाई केली. आरटीईमधील माहितीनुसार, रेल्वेने तात्काळ तिकीट विक्रीतून बक्कळ कमाई केली. 403 कोटी रुपयांची कमाई रेल्वेने केली. प्रिमियम तात्काळ तिकीट माध्यमातून रेल्वेने 119 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2020-21 या वर्षात रेल्वेने डायनॉमिक प्रवास भाडे योजनेतून 511 कोटी रुपये अर्जित केले. विशेष म्हणजे कोरोना काळात रेल्वेची सेवा पूर्णपणे बाधित झाली असताना आणि अनेक रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असताना रेल्वेचे उत्पन्न सुरू होते.
इतर बातम्या-