Love Jihad: श्रीरामपूर लव्ह जिहाद प्रकरण तापलं, हिंदूत्ववाद्यांच्या मोर्चानंतर पोलीस महानिरीक्षक थेट श्रीरामपुरात, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचण्याचे दिले आश्वासन
लव्ह जिहाद आणि मुलींना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथे पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. आत्तापर्यंत चार प्रकरणे समोर आली असून काही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लव्ह-जिहाद प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचल्याशिवाय पोलीस थांबणार नाही. अशी ग्वाही यावेळी बी जी शेखर यांनी दिली आहे.
श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur)शहरात लव्ह जिहाद (Love Jihad)आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गेल्या चाळीस दिवसापासून बेपत्ता मुलींचा तपास लावावा आणि आरोपींना कठोर शासन करावे, या मागणीसाठी आज शिवप्रहार प्रतिष्ठाणने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा (march on police station)काढला. श्रीरामपूर शहरातील लव्ह जिहादचा मुद्दा समोर आणल्यानंतर या प्रकरणात दररोज धक्कादायक घटना समोर येताना दिसताहेत. आत्तापर्यंत पाच मुलींची सुटका पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातुन झाली आहे. आणखी अनेक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडले असून, गेल्या चाळीस दिवसापासून बेपत्ता मुलीचा तपास लावावा या मागणीसाठी आज शिवप्रहार प्रतिष्ठानने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आरोपी मुल्ला कटर आणि त्याच्या साथीदारांनी अनेक मुलींचे जीवन उध्वस्त केले आहे. त्यासोबतच निकाह लावणारा काझी आणि इतरांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. या आंदोलनाची दखल थेट नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आहे. त्यांनी आज श्रीरामपूर पोलीस ठाण्याला भेट दिली.
काय म्हणाले पोलीस महानिरीक्षक?
लव्ह जिहाद आणि मुलींना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथे पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. आत्तापर्यंत चार प्रकरणे समोर आली असून काही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लव्ह-जिहाद प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचल्याशिवाय पोलीस थांबणार नाही. अशी ग्वाही यावेळी बी जी शेखर यांनी दिली आहे. या दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नागरीकांनीही पुढे येवून पोलीसांना सहकार्य करण्याचं आवाहनही पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
अल्पवयीन विद्यार्थिनींना शाळेतून पळवून नेत त्यांच्याशी बळजबरीने निकाह लावण्याच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येते आहे. या परिसरात 25 ते 26 जणांची टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. आत्तापर्यंत 10 हून जास्त मुलींचे अपहरण करुन त्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते आहे. या मुलींचे धर्मांतरण करुन त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. हा मुददा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा मांडला होता. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.