AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St workers strike : एसटीच्या संपावरील सुनावणीला पुन्हा तारीख पे तारीख, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

एसटीच्या संपाबाबतची सुनावणी आज पुन्हा पुढे ढकलली आहे, या प्रकरणात पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. या प्रकरणात त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केल्याची माहितीही समोर आली आहे.

St workers strike : एसटीच्या संपावरील सुनावणीला पुन्हा तारीख पे तारीख, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर
गुणरत्न सदावर्ते
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 5:31 PM
Share

मुंबई : एसटीच्या संपाबाबतची सुनावणी आज पुन्हा पुढे ढकलली आहे, या प्रकरणात पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. या प्रकरणात त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केल्याची माहितीही समोर आली आहे. आजपर्यंत 57 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांकडून लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 50 दिवस उलटून गेल्यानंतरही हा वाद मिटलेला नाही. त्यावर अनेक बैठका झाल्या, सरकारने ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ केली, मात्र तरीही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे सरकारने कारवाई करत 10 हजारांपेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे, अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा बजावल्या आहेत, तर 2 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत 57 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

सरकारने त्यांच्या प्रतीज्ञापत्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याच असल्याची माहिती दिल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. न्यायालयाने नोटिसा काढण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे ही सरकारला सर्वात मोठी फटकार आहे, अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आत्महत्येच्या बाबतीत सरकारचे वकील तांडव केल्यासारखे वागत होते, मात्र न्यायालायने त्यांना शब्द काढू दिला नाही. अनिल देशमुखांसाठी 1200 कोटी आणि कष्टकऱ्यांसाठी 325 कोटी जास्त कसे? असा प्रतिप्रश्नही सदावर्ते यांनी केला आहे.

औरंगाबादेत सरकारविरोधात घोषणाबाजी

याचवेळी औरंगाबाद बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत, संप पुढे चालू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कष्टकऱ्यांविरोधात कोणत्याही कडक कारवाईला न्यायलयाने परवानगी दिली नाही, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. एसटी कर्मचारी विलीकरण घेतल्याशिवाय राहणार नाहीत असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच अजय गुजर आणि अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत संप मागे घेत असल्याची घोषणा केली, मात्र त्यानंतर काही भागातील एसटी कर्मचाऱ्यांनी हा संघटनेचा संप नाही, हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे अशी भूमिका घेत विलीकरणाच्या मागणीवर ते ठाम राहिले आहेत.

महिला शेतकऱ्यांना कळाले गटशेतीचे महत्व, राज्य सरकारच्या निर्णयापूर्वीच परिवर्तनाची नांदी

Nagpur | कर्ज फेडण्यासाठी बनला चोर, वाहनचालकाने केली गाड्यांची चोरी; विक्रीच्या बेतात असताना अडकला

आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरील विरोधकांच्या प्रश्नांना आव्हाडांचा प्रतिप्रश्न

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.