आगामी लोकसभा, विधानसभा | कोण सत्तेत येणार?, यापूर्वी वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं, आताचं आणखी रंजक आणि मजेदार

महाराष्ट्राच्या राजकारण सध्या सर्वात अनपेक्षित वळणावरुन चाललं आहे, यात कधी काय होईल हे सांगणे फार कठीण आहे. पण ज्योतीष नीतिज्ञ अमित विभुते यांनी फक्त राजकारणच नाही, तर अनेक विविध विषयांवर जे कोणतं भविष्य वर्तवलेलं आहे, ते खरं ठरताना दिसतंय. अमित विभुते यांनी अदानी यांच्यावरील संकट ते महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर जे जे भविष्य मांडलंय, ते खरं ठरलं आहे, हे पुराव्यांमुळे नाकारता येत नाहीय.

आगामी लोकसभा, विधानसभा | कोण सत्तेत येणार?, यापूर्वी वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं, आताचं आणखी रंजक आणि मजेदार
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 8:21 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या. त्यातून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील अनेक बैठकांनंतर यावर अखेर 13 दिवसांनी तिढा सुटला. पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही.

या सगळ्या घडामोडींदरम्यान आता आगामी काळ हा अजित पवार यांच्यासाठी कसा असेल? हे महत्त्वाचं आहे. कारण अजित पवार यांनी सत्तेत येण्याचा घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मान्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पण दुसरीकडे अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी कशा असतील? याबाबत ज्योतिष नीतिज्ञ श्री अमित विभूते काय भाकीतं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ज्योतिष नीतिज्ञ अमित विभूते ‘यामुळे’ चर्चेत

ज्योतिष नीतिज्ञ श्री अमित विभूते यांनी अभ्यास करुन याआधी अनेक राजकीय गणितं मांडली आहेत. त्यांच्या या भाकीतांना महत्त्व राहण्यामागील कारण म्हणजे त्यांनी याआधी जे भाकीतं वर्तवली आहेत ते तंतोतंत खरी ठरली आहेत. त्यामुळे ते अनेकदा चर्तेतही आले आहेत.  त्यांनी याआधी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत वर्तवलेली भाकीतं कसे खरे ठरले आहेत याचे तारखेनुसार पुरावे आहेत.

हे सुद्धा वाचा

अमित विभूते यांच्यानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत या घडामोडींना सुरुवातच 2018 मध्ये झाली होती. अमित विभूते यांचं फेसबुकवर वॉर्निंग्स अ‍ॅण्ड अलर्ट (Warnings ans Alerts) नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अनेक भाकीतं वर्तवली होती. विशेष म्हणजे ही भाकीत खरी देखील ठरताना दिसत आहेत.

1) 2018 मधलं सर्वात पहिलं भाकीत दीड वर्षांनी 2019 मध्ये खरं ठरलं

अमित विभूते यांनी 7 फेब्रुवारी 2018 ला फेसबुकवर पोस्ट टाकली होती. यामध्ये त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मोठा दावा केला होता. “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष राजकारणात खूप महत्त्वाची भूमिका बजावणार, सत्तेत येण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकमेकांचा आधार घ्यावा लागेल. दोन्ही पक्ष आपलं क्षितीज वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी महत्त्वाचे प्रयोग करतील”, अशी पहिली पोस्ट अमित विभूते यांनी केली होती.

विशेष म्हणजे त्यानंतर पुढच्या दीड वर्षात खरंच तशाच घडामोडी घडून आल्या. महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची जवळीक वाढली. त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षांचं एकत्रित असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

2) 2018 मधलं भाजपबद्दलचं भाकीत 2019च्या निवडणुकीनंतर खरं ठरलं

अमित विभूते यांनी भाजप पक्षाबद्दल देखील महत्त्वाची पोस्ट केली होती. त्यांनी 21 एप्रिल 2018 ला विभूते यांनी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2019 या काळात सत्ताधारी पक्षाला खूप मोठं राजकीय नुकसानाला सामोरं जावं लागेल.” विशेष म्हणजे पुढच्या दीड वर्षात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आलं. विशेष म्हणजे सत्ताधारी असलेल्या भाजप पक्षाला विरोधी बाकावर बसावं लागलं.

3) फेब्रुवारी 2019 मधली भविष्यवाणी सहा महिन्यात खरी ठरली

अमित विभूते यांनी 14 फेब्रवारी 2019 ला फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं होतं. “आगामी काळात राष्ट्रवादी आणि शिवसेना किंगमेकर राहणार आणि मुख्यमंत्री या दोन पक्षांमधूनच निघणार. सत्ताधारी पक्षातील बुद्धिमान लोकंही हे सत्य बदलवू शकणार नाहीत”, असा मोठा दावा विभूते यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा दावा खरा ठरला.

भाजपकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला होता. पण भाजपचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

एवढंच नाही, अमित विभूते यांनी 21 मार्च 2019 ला तत्कालीन सत्ताधारी पक्षांविषयी महत्त्वाची फेसबुक पोस्ट केली होती. “सत्तापक्षाच्या अडचणी वाढतील, ज्याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील आणि ते दोन्ही पक्षांसाठी नुकसानदायक ठरतील. त्याचा परिणाम निवडणुकीचा निकालावर होईल”, असं विभूते म्हणाले होते.

विभूते यांनी त्यानंतर 24 एप्रिल 2019 ला म्हटलं होतं की, “सत्ताधारी पक्षाचं प्रभूत्व संपून जाणार आणि बहुमताचा देखील उपयोग होणार नाही. सत्ताधारी पक्षाचं मोठं नुकसान होणार”. विशेष म्हणजे ते भाजपबाबत तंतोतंत घडून आलं.

4) विभूते यांचा ठाकरे सरकारबद्दलचा ‘तो’ दावा खरा ठरला

महाष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण त्यानंतर काही महिन्यांनी जगावर कोरोना संकट आलं. राज्य सरकारपुढील आव्हानं वाढली. महाराष्ट्रासह देश आणि जगाने वर्ष-दीड वर्ष कणखरपणे या संकटाचा सामना केला. हे संकट ओसरत असताना 1 जून 2021 ला विभूते यांनी तत्कालीन राज्य सरकारबद्दल महत्त्वाचा दावा केला होता. त्यानंतर खरंच काही महिन्यांनी राज्याच्या राजकारणात तसे बदल बघायला मिळाले, असा विभूते यांचा दावा आहे.

“पुढील वर्ष म्हणजेच 2022 हे सरकारसाठी कसोटीचं राहील आणि तीन महिन्यानंतरच त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल”, अशी पोस्ट अमित विभूते यांनी केली होती. त्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत सामील व्हावं, अशी विनंती केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी राज्यात सत्तांतर घडून आलं.

अमित विभूते यांनी 17 डिसेंबर 2021 ला फेसबुक पोस्ट केली होती. “महाराष्ट्राच्या राजकारणात ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कार्यकाळात राजकारणात मोठे फेरबदल होणार”, असं भाकीत केलं होतं.

5) ठाकरे सरकार असताना युती रिटर्नची पोस्ट खरी ठरली

“23 फेब्रुवारी 2022 ला युती रिटर्न लवकरच”, अशी पोस्ट अमित विभूते यांनी केली होती. त्यानंतर चारच महिन्यांमध्ये 30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीचं सरकार स्थापन झालं.

6) एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या 10 दिवसांआधीची पोस्ट खरी ठरली

अमित विभूते यांनी 11 जून 2022 ला मोठं भाकीत वर्तवलं होतं. “2024 मध्ये इतर पक्ष उरतील का? कारण पक्षातील कार्यकर्ते संबंधितांशी असे वागतात की तेच मंत्री आहेत. 3-3 महिने बोलायला वेळ नसतो. पण आपलं काम असेल तर नक्कीच कसाही वेळ निघतो. 2024 मध्ये त्या पक्षांचे नक्कीच वाभाडे निघतील. जिथे कार्यकर्त्यांना नेहमीच लोकांसाठी वेळ नाही त्यांना लोकांनी धडा शिकवलाय आणि शिकवणार. पक्ष खतम तर नेतेही खतम”, अशी फेसबुक पोस्ट अमित विभूते यांनी केली होती. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याची बातमी समोर आली होती.

एकनाथ शिंदे गट गुवाहाटीला गेला होता. तसेच राज्यात सत्तांतर घडून आला. शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला. उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गेले.

7) अजित पवार यांच्या बंडाआधीचं वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं

अमित विभूते यांनी 12 फेब्रुवारी 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणाबद्दल महत्त्वाचं भाकीत केलं होतं. “महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक धक्कादायक आणि वेदनादायी घडामोडी बघायला मिळतील. या घडामोडींमुळे राज्याचे नागरीकही आवाक होतील. या घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षांचं देखील खच्चीकरण होईल. ताकदवान नेत्यांना धक्का बसेल आणि या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्व समीकरणं बदलतील”, अशी फेसबुक पोस्ट अमित विभूते यांनी केली होती.

विशेष म्हणजे जून महिन्यात अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी सुरुवातीला या चर्चांचं खंडन केलं. पण त्यानंतर अजित पवार यांनी 2 जुलैला थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

8) तीन महिन्याआधी केलेली भविष्यवाणी या महिन्यात खरी ठरली

अमित विभूते यांनी तीन महिन्यांपूर्वी 8 मार्च 2023 ला भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी आज खरी ठरली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार, सत्तेतील घटक पक्ष होणार किंवा मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार” असं भाकीत त्यांनी केलं होतं. त्यानंतर तीन महिन्यात खरंच राष्ट्रवादी पक्ष सत्तेत घटक पक्ष म्हणून सहभागी झाला.

अमित विभूते यांनी 7 एप्रिल 2023 ला फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “राज्यात नाट्यमयरित्या राजकीय परिवर्तन होणार. अनपेक्षित पद्धतीने नवीन राजकीय समीकरण सुरु होणार. पण स्थिर सरकारसाठी ते आवश्यक असणार. सत्तेत नवीन पक्षाची एन्ट्री होणार. लवकरच महाराष्ट्राचं मुख्य नेतृत्व बदलणार”, असं भाकीत विभूते यांनी वर्तवलं होतं. त्यापैकी अर्ध भाकीत तंतोतंत सध्या तरी खरं ठरलेलं दिसत आहे. महाराष्ट्राचं मुख्य नेतृत्व बदलणार का? ते आगामी काळात स्पष्ट होईल.

9) विभूते यांनी थेट भाकीतं केली

अमित विभूते यांनी फक्त राजकारणच नाही तर वेगवेगळ्या गोष्टींबाबत वेगवेगळी भाकीतं केली आहेत. तसेच त्यांची भाकीतं ही थेट आहेत. ती भाकीतं खरी ठरल्याचा देखील त्यांचा दावा आहे. भारताचे मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना मधल्या काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. हिंडेनबर्गने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालामुळे त्यांच्या उद्योगधंदे आणि शेअर्सवर खूप मोठा परिणाम पडला. विशेष म्हणजे अदानी यांच्यावर हे संकट कोसळण्याआधी अमित विभूते यांनी फेसबुक पोस्ट केली होती.

अमित विभूते यांनी 17 ऑगस्ट 2022 ला त्यांच्या फेसबूक ग्रुपमध्ये एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी एका उद्योगपतीबद्दल मोठा दावा केला होता. “फेब्रुवारी 2023 मध्ये एका मोठ्या व्यवसायिकाचं अंध:पतन सुरु होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचेल आणि सरकारचा पक्षपातीपणा त्याला जबाबदार असेल. स्वत: काळजी घ्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वत:चं रक्षण करा”, असं भाकीत विभूते यांनी वर्तवलं होतं. विशेष म्हणजे काही महिन्यांनी ते खरंदेखील ठरलं.

10) अमित विभूते यांची महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाबाबत पुढची भाकीतं काय?

ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत सत्तेचे गणितं बदलतील, राजकारणात असंतोष निर्माण होणार. सत्तेसाठी सिद्धांतांना मोडून बेरजेचं गणितं करणाऱ्या सर्व पक्षांना फायदा होईल की नुकसान? यावरदेखील आगामी काळात अमित विभूते भविष्य वर्तवणार आहेत.

राष्ट्रवादीतील कोणत्या पवारांना फायदा होणार की नुकसान? राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका राष्ट्रवादीला मदत करेल की नुकसान? महाविकास आघाडी परतणार की विस्मरणात जाणार? यावर विभूते हे परखड भविष्य मांडणार आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाच्या हाती लागणार? सत्ताधारी पक्षांना सत्ता राखण्यासाठी केवढी झुंज द्यावी लागेल? ती झुंज किती यशस्वी होणार? यावर देखील विभूते भविष्य मांडणार आहेत. तसेच राज्यात अजित पवार गट सोबत आला तरी येत्या काळात सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकवताना यश येणार का? एकनाथ शिंदे गटाचं पुढचं भवितव्य काय असेल? याबाबत अमित विभूते भविष्य मांडणार आहेत.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.