Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक केव्हाही, बी अ‍ॅलर्ट, कामाला लागा; विभागीय आयुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (sunil Kendrekar warns all top officials in Marathwada over coronavirus)

मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक केव्हाही, बी अ‍ॅलर्ट, कामाला लागा; विभागीय आयुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 12:55 PM

औरंगाबाद: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकणार असल्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून बीड, नांदेड आणि लातूरबाबत त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सुनील केंद्रेकर यांनी मराठावाड्यातील पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अ‍ॅलर्ट राहा, कोरोना रोखण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच दिले आहेत. (sunil Kendrekar warns all top officials in Marathwada over coronavirus)

सुनील केंद्रेकर यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप 11 मिनिटं 19 सेकंदाची आहे. या क्लिपमधून ते अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. क्लिपमध्ये किर्रर्र असा रातकिड्यांचा आवाज येत असल्याने केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांशी रात्री संवाद साधल्याचं दिसत आहे. या संपूर्ण 11 मिनिटे 19 सेकंदाच्या क्लिपमध्ये त्यांचा एकतर्फी संवाद सुरू आहे. तेच एकटे बोलत असून संबंधितांना सूचना देत आहेत. त्यांचं बोलणं असताना एकाही अधिकाऱ्याने त्यांना प्रश्न विचारलेला नाही किंवा त्यांच्या बोलण्याला हुंकारही दिलेला नाही. या क्लिपमधून केंद्रेकर कोरोनाचा उद्रेक होण्याच्या भीतीने चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना सूचना देतानाच मध्येमध्ये अधिकाऱ्यांवर भडकताना दिसत आहेत. ज्या जिल्हाधिकाऱ्यांची कामगिरी अत्यंत टुकार झाली आहे, त्यांनाही ते झापताना दिसत आहेत. एकूणच या संभाषणावरून मराठवाड्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ शकण्याची भीती व्यक्त होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना एकूण चार सूचना दिल्या आहेत.

मंगल कार्यालयांना नोटिसा पाठवा

“तुमच्या संध्याकाळच्या भिशीच्या अनुषंगाने सर्व सूचना लक्षात घ्या. नंबर एक. सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा. जर तिथे बिना मास्कचे आणि अलाऊड संख्येपेक्षा जास्त लोकं असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे. फाईन लावला पाहिजे आणि पोलीस केस दाखल करू म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे. सेकंड टाईमला मंगलकार्यालय पुन्हा हाऊस फुल सापडले तर गुन्हा दाखल करा आणि हे मंगल कार्यालय सील करा”, असा आदेशच केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

कोचिंग क्लासेसल नोटिसा द्या

“जे कोचिंग क्लासेस आहेत तिथेही रेड करा. फाईन लावा आणि मुलांनी मास्क लावलेत की नाही पाहा. सॅनिटाईजेशनची व्यवस्था आहे की नाही ते बघा आणि त्या सगळ्यांना नोटीस द्या. सेकंड टाईम सापडल्यावर कोचिंग क्लासेसला सील कराव्या लागतील. बाकी ज्या क्लोज्ड स्पेसेस आहेत. तिथेही ताबडतोब कारवाई करा. हे अर्जंट आहे. कारण सडनली स्पाईक होईल असं सध्या दिसत आहे. काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नवीन स्ट्रेन आला आहे. ते नाही म्हणत आहेत. पण मला काही ठिकाणी आढळलंय नवीन स्ट्रेन आल्याचं दिसून आलंय. हिंगोली, परभणी कलेक्टरला माझ्या सूचना आहेत की, तुमच्याकडचे मला फिडबॅक येत आहेत. तुमच्या जिल्ह्यात मोठमोठे विवाह सोहळे होत आहेत आणि काहीही कारवाई केली जात नाही. औरंगाबदामध्येही तीच परिस्थिती आहे. लग्न होतात आणि सर्व झोपा काढत आहेत. मला त्यावर इमिजेट अॅक्शन पाहिजेत”, असे फर्मान त्यांनी बजावले आहे.

कोविड टेस्ट बंधनकारक करा

यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या अनुषंगानेही काही सूचना केल्या आहेत. “खासगी डॉक्टरांकडे रुग्ण जात आहेत. सर्दी खोकला, ताप आणि फ्लू टाइप लक्षणे घेऊन हे रुग्ण जात आहेत आणि खासगी डॉक्टर त्यांना टेस्ट सजेट करत नाहीत. सर्व डॉक्टरांना लिखित स्वरुपात वॉर्निंग द्या की, कोणत्याही रुग्णाला फ्लू टाइप लक्षणे असल्यास किंवा कोविड टाईप लक्षणं असल्यास टेस्ट करण्यास कंपल्सरी असेल. नॉर्मल फ्लू आहे… नॉर्मल फिवर आहे म्हणून रुग्णाला घरी पाठवायणं चुकीचं होईल. पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तो आयसोलेट झाला पाहिजे, अशी स्पेसिफिकली डॉक्टरांना वॉर्निंग द्या”, असे आदेशच त्यांनी दिले आहेत.

तर लॉकडाऊन लावावा लागेल

“बिना मास्क फिरल्यास दंड केला जाईल, अशी मीडितान प्रसिद्धी द्या. काही ठिकाणी पेशंट आणि सर्दी पडसे किंवा फ्लू टाइप लक्षणं असलेली लोकं फिरली विदाऊट प्रोटेक्शन तर त्यांच्यावर इपिडेमिक अॅक्ट खाली स्प्रेड केलं म्हणून गुन्हे दाखल होतील. तुम्ही तुमचा एसपी, सीईओ आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अशा तिघांनी मिळून कृपा करून मोठ्या प्रमाणावर मीडियात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नागरिकांना वॉर्निंग द्या. नियम पाळले नाही तर मास्कचे दंड मोठ्या प्रमाणावर चालू राहिल असं स्पष्ट करा. तुमच्यासोबत पोलिसांना इन्व्हॉल्व करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ५० टक्के दंडाची रक्कम पोलिसांकडे वर्ग करा आणि ५० टक्के तुमच्या लोकल इन्स्टिट्यूशनकडे ठेवा. लोकांना वॉर्निंग द्या की ही परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावावा लागेल आणि लॉकडाऊन कडक स्वरुपाचा लावावा लागेल. तसेच लोकांना स्वत:हून बाहेर यायला सांगा. लोक बाहेर आले आणि ते अर्ली पेशंट असेल तर प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर होम आयसोलेशनचा विचार करू अन्यथा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्येच उपचार होईल हे लक्षात घ्या, असं लोकांना सांगा”, असे आदेशही त्यांनी दिले.

सीसीटीव्ही तपासा

यावेळी त्यांनी मराठवाड्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेशही दिले. “काही सीसीटीव्ही बंद झाले असतील तर त्याचा आढावा घ्या. कोणते कोणते बंद झाले, ते पाहा आणि त्याचं प्री प्लानिंग करा. तसेच व्हेंटिलेटर सुरू आहे की नाही डॉक्टरांना दिलेल्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत की नाही याकडे लक्ष द्या”, असं त्यांनी सांगितलं.

परभणीत टेन्शन

“परभणीत कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग अत्यंत पूअर आहे. मला माहीत नाही परभणीचा काय प्रॉब्लेम आहे. परभणी कलेक्टरला या गोष्टी दहा वेळा सांगून झाल्या. पण आहे त्या गोष्टी आहे तिथेच आहेत. कृपा करून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवा. माझ्याकडे जे रिपोर्ट आहेत त्यात तुमचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नऊ आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कलेक्टरचं २०च्या खाली येता कामा नये, असे सख्त आदेशही त्यांनी दिले. हिंगोली आणि बीडमध्येही कॉन्टॅक्ट टेस्टिंग अत्यंत कमी आहे. हिंगोली कलेक्टरने त्याची दक्षता घ्यावी. कामाचं काल कौतुक झालं आहे. पण टेस्टिंग नसेल तर हे चालणार नाही. टेस्टिंग झालं पाहिजे. तसेच भाजी मंडई आहे, वाहनधारक, दुकानदार आशा लोकांच्या रिपीट टेस्टिंग सुरू करा. पुन्हा पूर्वी जसं एरिया सील करायचो तसं करा. किमान मायक्रो सील करा. बिल्डिंग तरी सील करा आणि रुग्णांच्या घरच्या सर्व लोकांना तपासा आणि हे पेशंट बाहेर बोंबलत फिरणार नाही लोकांना इन्फेक्ट करणार नाही याची दक्षता घ्या”, असंही त्यांनी सांगितलं.

सेकंड व्हेव येणार

“लक्षात ठेवा पुन्हा सेकंड व्हेव फार मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. भारतात अनेक ठिकाणी 200, 400, 500 च्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणा करू नका. आणि त्याच त्या सूचना ज्या मागच्या वर्षी दिल्या टेस्टिंग करा, तपासणी करा, आरटीपीसीआर जास्त करा, हे बोलायला लावू नका”, अशी तंबीही त्यांनी दिली. (sunil Kendrekar warns all top officials in Marathwada over coronavirus)

लातूर, बीड, नांदेडची काळजी

“मला लातूर, बीड आणि नांदेडची काळजी आहे. परभणीच्या सिव्हिलची टेस्टिंग वगैरे फार बोगस आहे. मी त्यावर बिलकूल समाधानी नाही. हिंगोलीचं टेस्टिंग तर अत्यंत पुअर आहे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या. ट्रेसिंगकडे लक्ष द्या. त्याच त्या सूचना बोलायला लावू नका. सीईओनी यात पुढे आलं पाहिजे. यात मी म्युनिसिपल कमिशनरलाही जबाबदार धरणार आहे. बी अॅलर्ट मिशनरी आता पुन्हा टोनिंग करा आणि तुमचा रिस्पॉन्स टोनअप करा. पुन्हा या विषयावर वेगळी व्हिसी घेण्याची माझ्यावर वेळ आणू नका. जर आपण महिना दीड महिना टाईट राहिलो तर माझा अंदाज आहे की, बाय जून जर आपल्या स्वत:ला वाचवू शकलो तर ठिक नाही तर पुन्हा उन्हाळ्याचे तुमचे सर्व महिने याच तापात जातील. व्हीसी होतील. स्ट्रॅटिक्स होईल, आढावे होतील आणि मग प्रॉब्लेम होतील. ती वेळ येऊ देऊ नका आणि कामाला लागा”, असंही त्यांनी म्हटलं आहे. (sunil Kendrekar warns all top officials in Marathwada over coronavirus)

संबंधित बातम्या:

मुंबईतल्या चार वॉर्डात कोरोना रुग्णसंख्या वाढली, इमारतींना नोटीसा; पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

मोठी बातमी: पुण्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग

Asthma | दम्याच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ! वाचा काय आहेत याची कारणे, लक्षणे व उपाय…

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना नव्या आजाराची लागण; मुंबईच्या रुग्णालयातील चिंताजनक प्रकार

(sunil Kendrekar warns all top officials in Marathwada over coronavirus)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.