मंत्री तानाजी सावंत यांचा मविआ सरकार पाडण्यासाठी 150 बैठकांचा दावा कितपत खरा? जुना व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर तानाजी सावंत यांचा एक व्हिडीओ ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात येतोय. संबंधित व्हिडीओ हा त्यांचा गुवाहाटी दौऱ्याचा आहे. सत्तांतरावेळी ते गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी सत्तांतरावर बोलताना आपल्याला याबाबत काहीच कल्पना नव्हती, असं विधान केलंय. पण...

मंत्री तानाजी सावंत यांचा मविआ सरकार पाडण्यासाठी 150 बैठकांचा दावा कितपत खरा? जुना व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 4:07 PM

धाराशिव : राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला पाडून नवं सरकार स्थापन करण्यासाठी आपण 2019 पासून दीडशे पेक्षा जास्त बैठका घेतल्याचा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलाय. पण त्यांचा हा दावा कितपत खराय? याबाबत सोशल मीडियावर संशय व्यक्त केला जातोय. कारण तानाजी सावंत यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्यात येतोय. या व्हिडीओत सत्तापरिवर्तनाबद्दल आपल्याला काही माहिती नव्हतं. आपल्याला आमदार कैलास पाटील यांनी सांगितल्याचं तानाजी सावंत बोलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ तानाजी सावंत यांचा गुवाहाटीचा व्हिडीओ आहे.

तानाजी सावंत नव्या व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?

“ठाकूर साहेबांनी जे सांगितलं हे 2019 पर्यंत सांगितलं. 2019 नंतरचं मी सांगतो. त्यावेळेस सत्तेला बदलायचं काम चालू होतं. आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरु होती. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या बैठका होत होत्या. आमचे आताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास त्या दोन वर्षामध्ये शंभर ते दीडशे मीटिंग झालेल्या होत्या. माझ्या मराठवाड्यातील, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील, प्रत्येकाचं काऊंन्सलिंग मी करत होतो. ते उघडपणे करत होतो”, असं तानाजी सावंत म्हणाले.

तानाजी सावंत यांच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडीओत नेमकं काय?

“विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी मतदान झालं आणि दुपारी आमदार कैलास पाटील माझ्याजवळ आला. मला म्हटला की, आपल्याला भाईंना भेटण्यासाठी नंदनवनला जायचं आहे. नाहीतर मला या गोष्टी काहीच माहिती नव्हती. याउलट मी मतदान करुन माघारी जाणार होतो. माझी तब्येत ठीक नव्हती. चार दिवसांपूर्वीच माझा अपघात झाला होता. म्हणून मी म्हटलं की जाऊ. आम्ही नंदनवनला गेलो. भाईंशी त्यावेळी पू्र्ण चर्चा झाली. त्यानंतर मग आम्ही बाहेर आल्यानंतर तो म्हणला की चला आपण निघू. माझ्याकडे गाडी नाही. आपण तुमच्याच गाडीने निघू. ज्या दिशेने आपली चर्चा झाली त्या दिशेने आपल्या जायचंय, असं म्हटलं. त्यानंतर आम्ही गेलो”, असं तानाजी सावंत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

मंत्री सावंत यांच्यावर आमदार पाटील यांचा हल्लाबोल, ‘वक्तव्यात विरोधाभास – कॉऊंनसलिंग केले नाही’

आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सावंत यांच्या गुवाहाटी व धाराशिव येथील वक्तव्यात विरोधाभास आहे त्यामुळे जनतेने योग्य काय ते ठरवावे. मंत्री सावंत यांनी कधीही सत्ता परिवर्तन बाबत त्यांचे किंवा खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काउन्सलिंग केले नाही. आम्ही पूर्वी, आजही व भविष्यातही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार आहोत असे पाटील म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.