Gondia Accident | लग्नाची तारीख ठरवून गावी निघाले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! तिघे ठार

तिरोडा -साकोली रोडवर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित गाडी ही तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले (Chintaman Rahangdale)  यांच्या मालकिची असल्याची माहिती समोर येत आहे.

Gondia Accident | लग्नाची तारीख ठरवून गावी निघाले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! तिघे ठार
तिरोडा अपघात
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:25 PM

शाहिद पठाण | गोंदिया : तिरोडा -साकोली रोडवर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित गाडी ही तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले (Chintaman Rahangdale)  यांच्या मालकिची असल्याची माहिती समोर येत आहे. हीरदेसिंग आसाराम टेकाम रा. मंगेझरी वय 70 वर्ष आणि संपत  ठुररी आहाके. कोडेबर्रा वय 65  असे या अपघातामध्ये जागीच ठार झालल्या व्यक्तींची नावे आहेत. तर या अपघातामध्ये प्रताप संपत आहाके हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तिरोडा येथील जिल्हा रुग्णालयात (district hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लग्न जमवून घरी परतत होते

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या अपघातामध्ये मृत्यू झालेले तिघे हिरदे सिंग टेकाम यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख  ठरवून आपल्या गावी परतत होते. हे तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. लग्न ठरवून परतत असताना तिरोडा -साकोली रोडवरील सर्रा गावाच्या परिसरामध्ये हा अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकीची भिषण धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला तर चारचाकीमध्ये असलेले तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाहनांचे नुकसान

या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीचा चकनाचूर झाला आहे. तर चारचाकीचे देखील नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

संबंधित बातम्या

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु

Pimri chinchwad crime | खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू नगरसेविकेच्या आरोपामुळे खळबळ ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दुदैवी घटना ! राजमाची किल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकर्सचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.