खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स, एकनाथ शिंदेंची घोषणा

भविष्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अशा वाहतूक कोंडीला समारे जावे लागू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स नियुक्तीची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स, एकनाथ शिंदेंची घोषणा
ठाण्यातील रस्ते दुरुस्तीसाठी टास्क फोर्सची स्थापना
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 11:55 PM

ठाणे : अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. भविष्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अशा वाहतूक कोंडीला समारे जावे लागू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स नियुक्तीची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. (Task force under the chairmanship of Thane Collector for road repair work)

या बैठकीत रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंतक दुपारी 12 ते 4 वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले. त्याचप्रमाणे, जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियमन करण्यासाठी नवी मुंबई, पालघर, पडघा याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग लॉट उभारण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

पालकमंत्री, अधिकाऱ्यांची बैठक

पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंग, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी यावेळी उपस्थित होते. तर रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलिस अधीक्षक, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, एनएचएआय, मेट्रो, जेएनपीटी आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

असा आहे टास्क फोर्स

या टास्क फोर्समध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी ठाणे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचएआय आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. पावसाळ्याआधी रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे, तसेच पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या टास्क फोर्सला असतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेत शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाची पाहणी केली, तसेच कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा

शहराच्या सीमांवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार

ठाणे शहराशी संबंधित नसलेली अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या सीमांवर पार्किंगची व्यवस्था करून अवजड वाहनांचे नियमन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश ठाणे व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

‘महिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या’

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शनिवारी महिला सुरक्षेसंदर्भातही जिल्ह्यातील सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डोंबिवलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने महिलांच्या छोट्यामोठ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, जेणे करून भविष्यात त्यातून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होणार नाही.

महिला, तरुणींना पोलिसांकडे येऊन तक्रार करण्याबाबत विश्वास वाटला पाहिजे, तक्रार करण्यासाठी येणाऱ्या महिलांना उलटसुलट प्रश्न विचारून, त्यांचीच उलटतपासणी करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन वास्तू, इमारती, बंद कारखाने या भागांत गस्त वाढविण्याचे निर्दशही शिंदे यांनी यावेळी दिले. ठाणे जिल्हयातील पोलिस ठाण्यांमध्ये गस्तीसाठी अधिकची दुचाकी आणि चार चाकी वाहने उपलब्ध करून दिली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी ठाणे नवी मुंबई व मीरा भाईंदर येथील पोलिस आयुक्त, ठाणे व पालघरचे पोलिस अधीक्षक, ठाण्याचे जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या :

‘मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं’, अजितदादा चुकून चुकले! जाहीर सभेत ‘कानाला खडा’

सर्वोच्च न्यायालयात जाऊन ओबीसी आरक्षण अध्यादेश टिकवा आणि निवडणुका थांबवा, बावनकुळे आक्रमक

Task force under the chairmanship of Thane Collector for road repair work

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.