राष्ट्रवादीला जबरा खिंडार, गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘वेलकम’

पक्ष बांधणीसाठी कंबर कसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. गोंदियातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीला जबरा खिंडार, गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांनी केलं 'वेलकम'
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 11:59 AM

ठाणे : महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादीला जबरदस्त खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीला गोंदियात मोठा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या नावाने जयघोष केला. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

विकासासाठी शिंदेंना साथ

नगराध्यक्ष डॉ. चंद्रिकापुरे हे सडक अर्जुनी तालुक्यात राहतात. माझ्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सडक अर्जुनी नगर पंचायत आणि अर्जुनी नगरपंचायतमधील 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. विदर्भ हे मागास क्षेत्र आहे. आम्हाच्या भागात निधी डावलला जातो. त्यामुळे या भागाचा विकास व्हावा म्हणून आम्ही शिंदे गटात आलोय, असं या चंद्रिकापुरे यांनी सांगितलं.

अनेक नेते संपर्कात

दरम्यान, आमच्या संपर्कात अनेक नेते आणि कार्यकर्ते असल्याचा दावा यापूर्वीच शिंदे गटाने केला आहे. यात ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारीही असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे पक्षप्रवेश वाढतील असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसणार असल्याचं चित्रं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.