एकीशी लग्न, दुसरीशी सलगी; त्यातून त्याने केला हा संतापजनक प्रकार

आपल्याशी लग्न झालेले असतानाही भिवंडीतील एका तरुणीशी गुपचुप साखरपुडा करून लग्नाची तारीख ठरवली. याबाबत सासऱ्यांना जाब विचारला असता त्यांनीही आपणास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

एकीशी लग्न, दुसरीशी सलगी; त्यातून त्याने केला हा संतापजनक प्रकार
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 7:57 AM

ठाणे : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या एका उच्चभरू उच्चभ्रू सोसायटीमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. जून 2020 आली या दोघांचे लग्न झाले. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. याच दरम्यान पीडित महिलेचे पतीने अश्लील व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहाण केली. आपला पती भिवंडीतील एका तरुणीशी दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली.

या संदर्भात विचारणा केली असता पतीसह त्याच्या कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावले. या प्रकरणी पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीसह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

असा वाढला कौटुंबिक हिंसाचार

पीडित विवाहितेने या संदर्भात सविस्तर माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी पती महेश (वय 27, नाव बदललेलं) सह अन्य 5 जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आरोपी महेश याचे यापूर्वी लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीशी फारकत घेतल्यानंतर त्याने आपल्याशी लग्न केले.

धमकी दिल्याचे पीडितेचे म्हणणे

एके रात्री त्याने त्याच्या मोबाईलमध्ये समागमाचा व्हिडियो काढला. हा व्हिडिओ त्याने 10 मार्च रोजी व्हायरल केला. या व्हिडियोखाली समाजात बदनामी होईल असा मजकूरही टाकला. जाब विचारला असता आपणास मारहाणही करण्यात आली. पोलिसात तक्रार दिल्यास परिणाम वाईट होतील, अशीही आपणास धमकी दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

आपल्याशी लग्न झालेले असतानाही भिवंडीतील एका तरुणीशी गुपचुप साखरपुडा करून लग्नाची तारीख ठरवली. याबाबत सासऱ्यांना जाब विचारला असता त्यांनीही आपणास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 6 एप्रिल रोजी मैत्रिणीसह घरी असताना पतीचे नातेवाईक आले. त्यांनी देखील आपणास शिवीगाळ केली.

नातेवाईकांना संपवण्याची धमकी

तसेच तू जर महेशला सोडले नाही आणि त्याच्या लग्नात आडवी आलीस तर तुला जीवंत ठेवणार नाही. तुझे आई, वडील, भाऊ, बहिणीसह सर्व नातेवाईकांना संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आलाय. या प्रकरणी पीडित पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.