कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पहिल्यांदाच महिला आयुक्ताची नियुक्ती

KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पहिल्यांदाच महिला आयुक्ताची नियुक्ती
Indurani jakhar
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 2:39 PM

सुनील जाधव, कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगे याची तडकाफडकी बदली ( kdmc commissioner transfer ) करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे कारण गुलदस्त्यात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाला आहे. इंदुराणी जाखड ( Indurani Jakhar) यांची कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे कार्यरत होत्या.

नवनिर्वाचित आयुक्त आणखी चांगले काम करतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. इंदुराणी जाखड म्हणाल्या की, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सोबतच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार आहोत.

केडीएमसीचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची बदली राज्य सरकारी पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. भाऊसाहेब दांगडे यांनी १ वर्षे ३ महिने पालिका आयुक्त पदाची धुरा सांभाळली.

डॉ.इंदुराणी जाखड यांच्या रुपात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच महिला आयुक्त लाभल्या आहेत. इंदुराणी जाखड या महिला विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे या भागाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.