Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅकमेलिंग, तपास यंत्रणेचा दुरुपयोग हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंची टीका

आर्यन खानला (aryan khan) ड्रग्जप्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करणे हा भाजपचा धंदा आहे.

ब्लॅकमेलिंग, तपास यंत्रणेचा दुरुपयोग हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंची टीका
ब्लॅकमेलिंग, तपास यंत्रणेचा दुरुपयोग हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंची टीका
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:52 PM

ठाणे: आर्यन खानला (aryan khan) ड्रग्जप्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करणे हा भाजपचा धंदा आहे. भाजप ही ब्लॅकमेलिंग करणारी पार्टी आहे. आर्यन खान प्रकरणात आपण ते पाहिलच आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणात त्रास दिला गेला. या प्रकरणात आर्यनचा काहीच संबंध नसल्याचं एसआयटीनेही म्हटलं आहे. त्यामुळे भाजप केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सत्तेचा कसा दुरुपयोग करतंय हे आर्यन प्रकरणावरून स्पष्ट होत आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. नाना पटोले आज ठाण्यात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना आर्यनप्रकरणापासून ते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. तसेच भाजपवर घणाघाती हल्लेही चढवले.

नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही भाजपला धारेवर धरले. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी होत आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसींचा डेटा जमा करण्यात आला होता. हे डेटा देण्यास केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मनाई केली आहे. त्यामुळे ओबीसींच्या सामाजिक आणि राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. परिणामी ओबीसींचा उद्रेक झाला असून ओबीसींना आता काँग्रेसचं न्याय देऊ शकते, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

कोणतंही मिशन राबवा, पण विद्यार्थ्यांना आणा

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला काही सवाल केले. आपल्या देशातील मुलांना वाचवण्यात आलं पाहिजे. कित्येक मुलं त्यांचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यामुळे अंगावर काटा उभा राहत आहे. कोणतंही मिशन सुरू करा. पण आमची सर्व मुलं सुखरूप मायदेशी आणा एवढीच आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशात अराजकता माजवण्याचं काम सुरू

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्र सरकारकडून काहीही अपेक्ष नाही. एअर इंडिया विकली, रेल्वे विकली, गॅस दरवाढ केली, आता पाच राज्यांत निवडणुका सुरू आहेत. नंतर बघा पुढे काय होते. पुढे नोकऱ्या आल्या तर त्यामध्ये आरक्षण राहणार नाही. भाजपने सर्व सार्वजनिक उपक्रम विकले. या देशात अराजकता माजवण्याचं काम सुरू आहे. तर काँग्रेस संविधान वाचवण्याचं काम करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा

एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

Sanyogita Raje | ‘छत्रपती पराभूत झाल्यानंतर नवस मागणं सोडून दिलं पण…’

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....